Stock Market opening: भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झालेली दिसते. बाजार उघडताच निफ्टीने 22 हजारांच्या वरची पातळी ओलांडली आणि सकाळी 9.25 वाजता तो 28.90 अंकांनी वाढून 22,067 च्या पातळीवर व्यवहार करत होता. आजच्या व्यवहारात, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँकेच्या समभागांच्या घसरणीमुळे बाजारात कमजोरी दिसून येत आहे.
बँक निफ्टीमध्येही मोठी घसरण
बँक निफ्टी आज 310.80 अंकच्या घसरणीसह 46,552 वर उघडला आणि बँक निफ्टीच्या अर्ध्याहून अधिक समभाग कमजोरीसह उघडले.
सेन्सेक्स-निफ्टी समभागांची स्थिती
सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 13 समभागांमध्ये वाढ तर 17 समभाग घसरत आहेत. 50 निफ्टी समभागांपैकी 22 समभाग मजबूतीसह आणि 28 समभाग कमजोरीच्या लाल चिन्हासह व्यवहार करत आहेत.
प्री-ओपनिंगमध्ये बाजार
आज भारतीय बाजार तीन दिवसांनंतर उघडला आहे आणि बीएसई सेन्सेक्स 136.71 अंकांच्या घसरणीसह 72695 वर व्यवहार करत आहे. NSE चा निफ्टी घसरत होता आणि 359.60 अंकांनी घसरून 21737 च्या पातळीवर व्यवहार करत होता.