Stock market: शेअर बाजाराची तेजीसह सुरवात,सेन्सेक्सस मध्ये 800 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ

xr:d:DAF3BSR8GQg:14,j:7187031469550896546,t:23121511

Stock market: आठवड्यातील दुसऱ्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे आणि उत्कृष्ट जागतिक संकेतांमुळे भारतीय बाजार तेजीसह उघडला. आयटी, ऊर्जा आणि बँकिंग क्षेत्रात वाढ दिसून आली .

सेन्सेक्स पुन्हा 78000 पार करण्यात यशस्वी झाला आहे. सध्या बीएसई सेन्सेक्स 725 अंकांच्या उसळीसह 78083 वर व्यवहार करत आहे आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 227 अंकांच्या उसळीसह 23,681 अंकांवर व्यवहार करत आहे.

आजच्या व्यवहारात आयटी, बँकिंग, ऑटो, फार्मा, एफएमसीजी, धातू, ऊर्जा, कंझ्युमर ड्युरेबल्स, आरोग्यसेवा आणि तेल आणि वायू क्षेत्राचे शेअर्स वधारत आहेत. निफ्टी मिडकॅप निर्देशांक 818 अंकांच्या उसळीसह व्यवहार करत आहे आणि निफ्टी स्मॉलकॅप 287 अंकांच्या उसळीसह व्यवहार करत आहे. इंडिया VIX 4.09 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे.

आजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 26 समभाग वधारत आहेत तर 4 समभाग घसरत आहेत. वाढत्या समभागांमध्ये , अदानी पोर्ट्स 1.55 टक्के, इन्फोसिस 1.47 टक्के, TCS 1.01 टक्के, UltraTech 8, टाटा मोटर्स 2.18 टक्के, NTPC 2.17 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 1.61 टक्के टक्के वाढीसह व्यवहार करत आहेत.

घसरलेल्या समभागांमध्ये कोटक महिंद्रा बँक 0.49 टक्के, बजाज फिनसर्व्ह 0.48 टक्के, सन फार्मा 0.24 टक्के, ॲक्सिस बँक 0.05 टक्क्यांनी घसरत आहे.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ
मंगळवारच्या सत्रात शेअर बाजार मोठ्या वाढीसह उघडला, त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी झेप झाली आहे. बीएसईवर सूचीबद्ध समभागांचे मार्केट कॅप 432.96 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे मागील सत्रात 429.08 लाख कोटी रुपये होते. आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3.88 लाख कोटी रुपयांची झेप होताना दिसत आहे.