---Advertisement---

Stock market closing : शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 1089 तर निफ्टी 374 अंकांनी वधारला

by team
---Advertisement---

Stock market closing : सोमवारी झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आज ८ एप्रिल रोजी भारतीय शेअर बाजारांनी चांगले पुनरागमन केले. आजच्या व्यवहार बंद होताना सेन्सेक्स १०८९.१८ अंकांनी वाढून ४,२२७.०८ वर बंद झाला.तर निफ्टी ३७४.२५ अंकांनी वाढून २२,५३५.८५ वर बंद झाला. निफ्टीचे जवळजवळ सर्व १३ प्रमुख क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात व्यवहार करत होते.

टायटन, अदानी पोर्ट्स, बजाज फिनसर्व्ह, एसबीआय आणि अ‍ॅक्सिस बँके, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि भारती एअरटेल, एचडीएफसी बँक आणि एल अँड टी या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली.

कोणते शेअर्स वधारले?

आज बीएसई सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 29 शेअर्स वाढीसह बंद झाले. यामध्ये टायटनच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 3.25 टक्के वाढ झाली. यानंतर, बजाज फायनान्स, लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी), स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि अ‍ॅक्सिस बँकेचे शेअर्स वाढीसह बंद झाले. दुसरीकडे, सेन्सेक्सचा फक्त एक शेअर, पॉवर ग्रिड, आज किंचित घसरणीसह लाल रंगात बंद झाला.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment