Stock market : शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; टॅरिफ वॉर बाबत ट्रम्प यांचा यू-टर्न

Stock market: मंगळवारी देशांतर्गत शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात झाली. सेन्सेक्समध्ये 400 पेक्षा जास्त अंकांची वाढ झाली, तर निफ्टी 23,500 च्या वर उघडला. बँक निफ्टीतही जवळपास 430 अंकांची वाढ नोंदवली गेली. मिडकॅप निर्देशांक 700 अंकांनी वधारला. मेटल शेअर्समध्येही चांगली तेजी होती. आज सकाळी रुपया 15 पैशांनी मजबूत होत 87.04/$ वर उघडला.

जागतिक बाजारांकडून मंगळवारी (4 फेब्रुवारी) स्थिर संकेत मिळाले. GIFT निफ्टी 100 अंकांनी वधारून 23,550 च्या जवळ गेला. टॅरिफ वॉरचा धोका सध्या टळल्याचे दिसत आहे. टॅरिफ वॉरबाबत ट्रम्प यांनी यू-टर्न घेतला असून, मेक्सिको आणि कॅनडावर 25% टॅरिफ लावण्याचा निर्णय एका महिन्यासाठी पुढे ढकलला आहे. ट्रम्प यांच्या नरम भूमिकेमुळे अमेरिकी बाजार सावरले. मोठ्या घसरणीनंतर डाऊ जोन्स 550 अंकांनी सुधारून केवळ 122 अंक खाली बंद झाला, तर नॅसडॅक 250 अंकांनी घसरला.

कालच्या घसरणीत FIIs (विदेशी गुंतवणूकदारांनी) कॅश, इंडेक्स आणि स्टॉक फ्युचर्समध्ये मिळून 7,100 कोटी रुपयांची विक्री केली, तर देशांतर्गत फंड्सनी 2,700 कोटींचे शेअर्स खरेदी केले.

बाजारासाठी महत्त्वाचे ट्रिगर:

  • ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडावर टॅरिफ 1 महिन्यासाठी पुढे ढकलले.
  • रिकव्हरीनंतर डाऊ 122 आणि नॅसडॅक 235 अंकांनी घसरून बंद.
  • डॉलर इंडेक्स, यूएस बॉन्ड्स आणि क्रूड घसरले, तर सोन्याने उच्चांक गाठला.
  • निकाल: Power Grid, HFCL संमिश्र; Tata Chem कमकुवत.
  • निफ्टीमध्ये Asian Paints, Titan सह वायदा बाजारातील 5 कंपन्यांचे निकाल आज येणार.
  • FIIs नी कॅश आणि वायदा बाजारात 7,137 कोटी रुपयांची विक्री केली.