शेअर बाजारात होणाऱ्या घसरणीला अद्यापही ब्रेक लागलेला नाही. आठवड्यातील दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स २६८ अंकांच्या घसरणीसह ७२,८१७ वर उघडला . निफ्टी देखील १४५ अंकांनी घसरून २१,९७४ वर उघडला. बँक निफ्टीबद्दल बोलायचे झाले तर, तो १७२ अंकांनी घसरून ४७,९४२ वर उघडला.
क्षेत्रीय निर्देशांकांचीही अशीच स्थिती आहे. आयटी, धातू, फार्मा आणि रिअल्टी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विक्री दिसून येत आहे. निफ्टी आयटी निर्देशांकात २ टक्क्यांची घसरण झाली आहे. उर्वरित निर्देशांकही १ टक्क्यांहून अधिक घसरणीसह व्यवहार करत आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज मेक्सिको आणि कॅनडावर अतिरिक्त २५ टक्के आणि चीनवर १० टक्के शुल्क लागणार आहेत. ट्रम्प या शुल्कात कोणतीही सवलत देणार नसल्याचं त्यांनी कालच सांगितले होते. परंतु ट्रम्पच्या शुल्काबाबतच्या कठोर भूमिकेमुळे अमेरिकन बाजारपेठेत गोंधळ निर्माण झाला.
आजच्या काही मोठ्या बातम्या
रशिया-युक्रेन युद्धात मोठे वळण आले आहे. अमेरिकेने युक्रेनला लष्करी मदत थांबवली आहे. ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यातील जोरदार वादविवादानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ब्लूमबर्गच्या हवाल्याने ही बातमी मिळाली आहे.
टाटा कॅपिटल या वर्षातील सर्वात मोठा आयपीओ आणू शकते. अहवालांनुसार, ते सुमारे १ लाख कोटी रुपयांच्या मूल्यांकनासह आयपीओमधून सुमारे १८००० कोटी रुपये उभारू शकते.
सेबीने पर्यायी गुंतवणूक निधीला डिफरेंशियल राईट्स इश्यू रिपोर्टिंगमध्ये एक महिन्याची सवलत दिली. अंतिम मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवली.