---Advertisement---

Stock Market Opening: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; मंदीच्या भीतीचा परिणाम ?

by team
---Advertisement---

जागतिक बाजारात मंदीच्या भीतीने अस्थिरता निर्माण झाली आहे. परिणामी अमेरिकन शेअर बाजारात जोरदार विक्री दिसून आली, त्यामुळे प्रमुख निर्देशांक मोठ्या घसरणीसह बंद झाले. आज त्याचा प्रभाव भारतीय बाजारावरही दिसून आला आहे.सेन्सेक्स आणि निफ्टीची सुरुवात घसरणीने झाली आहे. आज सेन्सेक्स 372 अंकांनी घसरून 73,743 वर उघडला. तर निफ्टी-50 115 अंकांनी घसरून 22,345 वर उघडला.

निफ्टीमध्ये आजच्या व्यवहारात बँक, ऑटो, फायनान्शिअल, एफएमसीजी, मेटल, आयटी, फार्मा आणि रियल्टी निर्देशांक लाल रंगात व्यवहार करत आहेत. तर सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 24 शेअर्स लाल रंगात व्यवहार करत आहेत.

आज देशांतर्गत शेअर बाजारांसाठी जागतिक संकेत खूपच कमकुवत दिसत आहेत. आजच्या व्यवहारात प्रमुख आशियाई बाजारांमध्ये विक्री दिसून येत आहे. याआधी सोमवारी अमेरिकन बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाले होते. सोमवारी, डाऊ जोन्स इंडस्ट्रियलमध्ये 890 अंकांची घसरण झाली होती आणि तो 41,911.71 च्या पातळीवर बंद झाला.

कमोडिटी बाजारावरही परिणाम

मंदीच्या भीतीचा परिणाम कमोडिटी बाजारावरही दिसून आला. कच्चे तेल २ टक्क्यांनी घसरून ६९ डॉलर प्रति बॅरलच्या खाली आले, ज्यामुळे जागतिक ऊर्जा बाजारातही कमकुवतपणा दिसून आला. त्याच वेळी, सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखले जाणारे सोने आणि चांदी देखील मोठ्या प्रमाणात घसरले. सोने ३५ डॉलर प्रति औंस २,९०० डॉलरच्या खाली आले, तर चांदी २ टक्क्यांनी घसरून ३३ डॉलरच्या खाली आली. त्याचा परिणाम भारतीय बाजारातही दिसून आला.

क्रिप्टो बाजारात विक्री

मंदीच्या भीतीने क्रिप्टोकरन्सी बाजारालाही हादरवून टाकले. चार महिन्यांत पहिल्यांदाच बिटकॉइन ५ टक्क्यांनी घसरून ८०,००० डॉलरच्या खाली आले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment