Stock Market : शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात, निफ्टी 23,800च्या वर

xr:d:DAF3BSR8GQg:14,j:7187031469550896546,t:23121511

Stock Market : गुरुवारी (२६ डिसेंबर) रोजी भारतीय शेअर बाजाराची सुरवात सकारात्मक झाली आहे. सेन्सेक्सने 200 हून अधिक अंकांच्या वाढीसह सुरुवात केली. निफ्टीही 100 हून अधिक अंकांच्या वाढीसह व्यवहारासह सुरु झाला . बँक निफ्टी 500 हून अधिक अंकांनी वाढला . मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही हिरव्या रंगात व्यवहार करत होते. बँकिंग समभागांच्या वाढीमुळे बँक निफ्टीला पाठिंबा मिळत असल्याचं बाजाराच्या सुरवातीला पाहायला मिळालं.

ओपनिंगमध्ये, सेन्सेक्स मागील बंदच्या तुलनेत 85 अंकांनी झेप घेऊन 78,557 वर उघडला. निफ्टी 48 अंकांनी उसळी घेत 23,775 वर उघडला. आणि बँक निफ्टी 162 अंकांनी वाढून 51,395 वर उघडला. चलन बाजारात, रुपया 3 पैशांनी कमजोर होऊन 85.23/$ वर उघडला, जो त्याचा विक्रमी नीचांक आहे.

टाटा मोटर्स, अदानी एंटरप्रायझेस, आयशर मोटर्स, बीपीसीएल, आयटीसी यांसारख्या समभागांची निफ्टीमध्ये वाढ झाली. तर पॉवर ग्रिड, जेएसडब्ल्यू स्टील, एसबीआय लाईफ, टायटन, इंडसइंड बँक या समभागांमध्ये घसरण नोंदवली गेली. PSU आणि खाजगी बँकांचे निर्देशांक सर्वोच्च पातळीवर होते. त्याचवेळी एनबीएफसीच्या समभागातही वाढ झाली. याशिवाय ऑटो, एफएमसीजी, ग्राहकोपयोगी वस्तू, तेल आणि वायू या निर्देशांकात वाढ झाली. रियल्टी आणि फार्मामध्ये घसरण दिसून आली.