---Advertisement---

Stock Market : शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी 23,250 च्या आसपास, ‘या’ कंपन्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.

by team
---Advertisement---

Stock Market: सोमवारी (२० जानेवारी) आठवड्यातील पहिल्या  ट्रेडिंग सत्रात   देशांतर्गत शेअर बाजार वाढीसह उघडले. सेन्सेक्स २०० अंकांनी वाढला. निफ्टी ५० अंकांपेक्षा जास्त वाढला आणि २३,२५० च्या आसपास दिसला. बँक निफ्टी १५५ अंकांच्या वाढीसह ४८,७०६ च्या पातळीवर व्यवहार करत होता.

कोणते शेअर्स वधारले ?

विप्रो, कोटक बँक, एसबीआय, रिलायन्स, बजाज फायनान्स हे निफ्टीवर सर्वाधिक वाढीसह  खाजगी बँक, एनबीएफसी, ग्राहकोपयोगी वस्तू, मीडिया यासारख्या निर्देशांकांमध्ये वाढ होत होती.

कोणते शेअर्स घसरले ?

धातू, ऑटो, फार्मामध्ये घसरण झाली पाहायला मिळत असून, श्रीराम फायनान्स, इंडसइंड बँक, एसबीआय लाईफ, अदानी पोर्ट्स, एचडीएफसी बँक हे सर्वाधिक तोट्यात होते.

या कंपन्यांच्या निकालावर लक्ष ?

वन 97 कम्युनिकेशन्स (पेटीएम), झोमॅटो, एपीएल अपोलो ट्यूब्स, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, डिक्सन टेक, आयडीबीआय बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन (आयआरएफसी), आयसीआयसीआय सिक्युरिटीज, जम्मू आणि काश्मीर बँक, एल अँड टी फायनान्स, एमसीएक्स इंडिया, न्यूजेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज, ओबेरॉय रियल्टी आणि सनटेक रियल्टी या कंपन्या डिसेंबर तिमाहीचे निकाल आज जाहीर करतील.

 जागतिक बाजारातील  संकेत

देशांतर्गत शेअर बाजारासाठी जागतिक संकेत अधिक चांगले दिसत आहेत. आजच्या व्यवहारात प्रमुख आशियाई बाजारांमध्ये खरेदी दिसून येत आहे. याआधी शुक्रवारी, डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी, अमेरिकन बाजार मोठ्या तेजीसह बंद झाले होते.

शुक्रवारी डाऊ जोन्स इंडस्ट्रियल 335 अंकांनी वाढून 43487.83 च्या पातळीवर बंद झाला. NASDAQ Composite 292 अंकांनी वाढून 19630.20 च्या पातळीवर बंद झाला. तर S&P 500 निर्देशांक सुमारे 59 अंकांनी वाढून 5996.66 च्या पातळीवर बंद झाला.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment