होळी आणि ईदसह मार्चमध्ये 12 दिवस शेअर बाजार राहणार बंद, पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

मार्च 2025 मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) मध्ये एकूण 12 दिवस कोणतेही व्यवहार होणार नाहीत. या सुट्ट्यांमध्ये साप्ताहिक सुट्ट्या आणि महत्त्वाच्या सणांच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. होळी आणि ईद-उल-फित्र या दोन प्रमुख सणांमुळे महिन्यातील शेअर बाजार बंद राहण्याच्या दिवसांची संख्या वाढली आहे.

मार्च 2025 मधील शेअर बाजार सुट्ट्या:
मार्च महिन्यातील सुट्ट्या दोन प्रकारांत विभागल्या जातात—साप्ताहिक सुट्ट्या आणि सणांमुळे होणाऱ्या सुट्ट्या.

हेही वाचा : भारतातलं असंही एक गाव, लग्नानंतर वधू सात दिवस राहते विवस्त्र, जाणून घ्या कुठली आहे ‘ही’ प्रथा

साप्ताहिक सुट्ट्या (शनिवार आणि रविवार)

रविवार: 2, 9, 16, 23, 30 मार्च

शनिवार: 1, 8, 15, 22, 29 मार्च

सणांच्या सुट्ट्या

होळी: 14 मार्च 2025 (शुक्रवार)

ईद-उल-फित्र (रमजान ईद): 31 मार्च 2025 (सोमवार)

सलग तीन दिवस बाजार बंद राहणार

या महिन्यात दोन वेळा सलग तीन दिवस शेअर बाजार बंद राहणार आहे

होळीच्या सुट्ट्यांमुळे (14 मार्च ते 16 मार्च)

14 मार्च: होळी (शुक्रवार)

15 मार्च: शनिवार (साप्ताहिक सुट्टी)

16 मार्च: रविवार (साप्ताहिक सुट्टी)

मार्चच्या शेवटी (29 मार्च ते 31 मार्च)

29 मार्च: शनिवार (साप्ताहिक सुट्टी)

30 मार्च: रविवार (साप्ताहिक सुट्टी)

31 मार्च: ईद-उल-फित्र (सोमवार)

2025 मध्ये एकूण किती सुट्ट्या?

BSE आणि NSE च्या अधिकृत हॉलिडे कॅलेंडरनुसार, 2025 मध्ये शनिवार आणि रविवारी मिळून एकूण 104 साप्ताहिक सुट्ट्या आहेत. त्याशिवाय, वर्षभरात एकूण 14 दिवस सणांमुळे बाजारात सुट्टी असेल. काही सण शनिवार आणि रविवारी आल्याने यंदा सुट्ट्यांची संख्या तुलनेने थोडी कमी झाली आहे.