शेअर बाजार : आठवड्याचे पहिले ट्रेडिंग सत्र भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी निराशाजनक ठरले आहे. बँकिंग आणि आयटी समभागांमध्ये झालेल्या विक्रीमुळे बाजार घसरणीसह बंद झाला. मात्र, आजच्या व्यवहारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 362 अंकांच्या घसरणीसह 72,470 वर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 92 अंकांच्या घसरणीसह 22005 अंकांवर बंद झाला.