Stock markets : आठवड्यातील शेवटचे ट्रेडिंग सत्र भारतीय शेअर बाजारासाठी दिलासा देणारे ठरले. आयटी समभागांमध्ये जोरदार विक्री होऊनही भारतीय शेअर बाजार सकारात्मक पातळीवर बंद झाला. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 190 अंकांच्या उसळीसह 72,832 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 84 अंकांच्या उसळीसह 22,097 अंकांवर बंद झाला.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ
आजच्या व्यवहारात बाजारातील वाढीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. बीएसईवर सूचीबद्ध समभागांचे बाजार मूल्य 382.13 लाख कोटी रुपये होते जे गेल्या सत्रात 380 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात शेअर बाजाराच्या बाजार भांडवलात 2.13 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.