Stock markets close : गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे भारतीय बाजार मंगळवारचे ट्रेडिंग सत्र भारतीय शेअर बाजारा साठी निराशाजनक ठरले. आजच्या व्यवहारात सर्वात मोठी घसरण आयटी आणि एफएमसीजी समभागांमध्ये दिसून आली. आज बाजार बंद होताना BSE सेन्सेक्स 195 अंकांनी घसरून 73,677 वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 49 अंकांच्या घसरणीसह 22,356 अंकांवर बंद झाला.
आजच्या व्यापारातील घसरणीमुळे भारतीय शेअर बाजाराचे बाजार भांडवल कमी झाले आहे. बीएसईवर सूचीबद्ध समभागांचे बाजार मूल्य 393.04 लाख कोटी रुपयांवर आले आहे जे गेल्या सत्रात 393.75 लाख कोटी रुपये होते. आजच्या सत्रात बाजाराचे मूल्यांकन 71000 कोटी रुपयांनी कमी झाले आहे.
वाढत्या समभागांमध्ये टाटा मोटर्स 3.51 टक्के, भारती एअरटेल 3.12टक्के, बजाज ऑटो 1.76 टक्के, ओएनजीसी 1.63टक्के, एसबीआय1.54टक्के, सन फार्मा 1.42 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. बजाज फिनसर्व्ह 4.25 टक्के, बजाज फायनान्स 4.21टक्के, नेस्ले 1.95 टक्क्यांनी घसरले.