Stock Market Closing: शेवटच्या तासात झालेल्या विक्रीमुळे शेअर बाजार किंचित वाढीसह बंद

Stock markets: मंगळवारच्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजार किंचित वाढीसह बंद झाला. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 240 अंकांच्या उसळीसह 77,578 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 65 अंकांच्या उसळीसह 23,518 अंकांवर बंद झाला.

आजच्या व्यवहारात बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, एफएमसीजी, रिअल इस्टेट, मीडिया, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि हेल्थकेअर क्षेत्रातील समभाग वाढीसह बंद झाले. तर तेल आणि वायू, वस्तू, ऊर्जा, धातू आणि पीएसयू बँक समभागांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले.

आजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील 30 पैकी 17 समभाग वाढीसह बंद झाले तर 13 समभागांमध्ये घसरण झाली. निफ्टीच्या 50 समभागांपैकी 23 वाढीसह बंद झाले तर 27 घसरले. वधारलेल्यांपैकी महिंद्रा अँड महिंद्रा 3.07 टक्के, टेक महिंद्रा 1.90 टक्के, एचडीएफसी बँक 1.82 टक्के, टायटन 1.58 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. रिलायन्स 1.83 टक्के, एसबीआय 1.43 टक्के, बजाज फिनसर्व्ह 1.21 टक्के, मारुती 1.20 टक्के, टाटा स्टील 1.17 टक्के, भारती एअरटेल 0.98 टक्के घसरत बंद झाले.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ
शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. बीएसईवर सूचीबद्ध समभागांचे मार्केट कॅप 430.39 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे शेवटच्या सत्रात 429.08 लाख कोटी रुपयांवर बंद झाले.