---Advertisement---

Stock Markets : देशांतर्गत शेअर बाजार तेजीसह बंद

by team
---Advertisement---

Stock Markets :  सोमवारी (२० जानेवारी)  आज सकाळी बाजार वाढीसह उघडला. त्यानंतर, बेंचमार्क निर्देशांक चांगल्या वाढीसह व्यवहार करत होते. सेन्सेक्सने ६०० अंकांची उसळी घेतली. त्याच वेळी, निफ्टी देखील सुमारे १५० अंकांच्या वाढीसह २३,३५० च्या आसपास व्यवहार करत होता. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्ये खरेदी दिसून आली.

तसेच आजच्या व्यवहारांती देशांतर्गत शेअर बाजारात तेजी दिसून आली . तिसऱ्या तिमाहीच्या निकालांमुळे बँकिंग आणि धातू क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाली.

निफ्टी १४१ अंकांच्या वाढीसह २३,३४४ वर बंद झाला. सेन्सेक्स ४५४ अंकांच्या वाढीसह ७७,०७३ वर बंद झाला. बँक निफ्टी ८१० अंकांच्या वाढीसह ४९,३५० वर बंद झाला. निफ्टी मिडकॅप १०० ४८६.७५ अंकांच्या वाढीसह ५५,१०० वर बंद झाला. निफ्टी स्मॉलकॅप १०० १८५ अंकांच्या वाढीसह १७८५४ वर बंद झाला. निफ्टी ऑटो आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांक घसरले.

कोणते शेअर्स वधारले ? 

कोटक महिंद्रा बँक +९%, विप्रो +६%, बजाज फायनान्स +४% आणि बजाज फिनसर्व्ह +३% हे निफ्टीवर सर्वाधिक वाढणारे निर्देशांक होते.

तर एसबीआय लाईफ -३%, ट्रेंट -२%, श्रीराम फायनान्स -२% आणि एचडीएफसी लाईफ -१% हे सर्वाधिक नुकसानीत  होते.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment