चोरलेली दुचाकी; नंबर प्लेट तोडून वापरायचे, अखेर स्थानिक गुन्हे शाखेने..

तरुण भारत लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२२ । जळगाव शहरातील गोलाणी मार्केट येथून दुचाकी चोरीच्या दाखल गुन्ह्यातील चोरट्यांना मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी अटक केली. विजय उत्तम सुतार व चंचल ओमप्रकाश सालवी दोन्ही रा. गोलाणी मार्केट, जळगाव. असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. विशेष म्हणजे, चोरी केलेली दुचाकी नंबर प्लेट तोडुन वापरत असताना पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल होता, अखेर स्थानिक गुन्हे शाखेने तो उघडीस आणला आहे.

पोलीस सूत्रानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना आरोपी विजय सुतार व चंचल ओमप्रकाश यांनी दि. ११ रोजी गोलाणी मार्केट येथून काळया रंगाची मोटार सायकल चोरी केली असून तिची नंबर प्लेट तोडुन सध्या ते तिच वापरत आहेत तसेच ते शहरातील पांडे चौकात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांचे पथकांना रवाना करून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी  जळगाव शहर पो.स्टे. CCTNS नं. ०३७५/२०२२ भादंवि क.३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असून आरोपीतांना पुढील तपासकामी जळगाव शहर पो.स्टे. चे ताब्यात देण्यात आले आहे.

 यांनी कारवाई केली
जळगाव जिल्हयांत मोटारसायकल चोरीच्या गुन्हयांत वाढ झाल्याने एम.राज कुमार पोलीस अधीक्षक, जळगाव. व चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी किसन नजन पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना मोटार सायकलचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेश दिले होते. त्यावरुन पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखे कडील पोह दिपक शांताराम पाटील, लक्ष्मण अरुण पाटील, पोना/ किशोर ममराज राठोड, रणजित अशोक जाधव, श्रीकृष्ण खंडेराव देशमुख, ईश्वर पंडीत पाटील, चापोकॉ मुरलीधर सखाराम बारी व पो.ना. अशोक पाटील यांनी ही कारवाई केली.