जळगाव । मेहरुणमधील जोशी वाड्यात लहान मुलांनी काढलेल्या श्रीरामाचा लहान रथ मिरवणुकीवर मुस्लिमांच्या एका गटाने तब्बल २५ मिनिटे तुफान दगडफेक केली. तरुणांनी गल्लीत येऊन हातातील दगड जोशी वाड्याच्या दिशेने भिरकाविल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तणाव व दहशत निर्माण करण्याच्या उद्देशातून ही दगडफेक केल्याचे जोशी वाड्यातील रहिवाशांकडून सांगण्यात आले १५ ते २० मिनिटांपर्यंत हा थरार सुरू होता. महिला, लहान मुलांची आरडाओरड, आणि दगडांचा आवाज असा थरकाप उडविणारा प्रकार पूर्वनियोजितच होता असेच लक्षात येत आहे.
जळगावातील श्रीराम रथोत्सव निमित्ताने मेहरुणमधील जोशी वाड्यातील लहान मुलांनी मंगळवार, १२ रोजी लहान रथ नेहमीप्रमाणे सजविला होता. रथात मुलांनी चिमुकली श्रीरामाची मूर्ती ठेवली. त्यानंतर संध्याकाळी गल्लीतून त्यांनी या लहान रथाची मिरवणूक काढली. जोशी बाड्यातील नागरिकांच्या माहितीनुसार, जयश्रीराम घोष करीत हे बालके रथावर फुलांच्या पाखळ्यांची उधळण करीत होते. आणि रथही ओढत होते. लहान- लहान मुलेच वाजत गाजत या मिखणुकीत सामील झाले होते. मुले उधळत असलेल्या फुलांच्या पाकळ्या एका घराच्या ओट्यावर पडल्या. त्या पाठोपाठ एक दगड स्थावर पडला. तेव्हा कुणाचे लक्षही गेले नाही. त्यानंतर दुसरा दगड आला. व दगडफेक वाढली. एका गटाने दरवाज्याची तोडफोड करत चार-पाच घरांच्या दरवाजाची दगडफेक केली. पाण्याच्या टाक्या फोडल्या यात स्थानिक नागरिक हा वाद मिटविण्यासाठी पुढे आले. एका मुस्लिम तरुणाने तर हातात लाकडी दांडा आणत एका इसमाला मारहाण केली. त्यात ते गृहस्थ जखमी झाले. तर दुसरीकडे दगड विटांचे तुकडे भिरकाविले जात होते. पोलिसांची चाहूल लागताच हा जमाव पळून गेला.
यापूर्वीही अशाच घटना
यापूर्वी जोशी वाड्यात २२ जानेवारी २०२४ रोजी दगडफेक झाली होती. त्यानंतर २२ एप्रिल २०२४ रोजीही दुसरी दगडफेकीची घटना घडली. त्यावेळी समझोता घडविण्यात आल्याने तक्रार न देण्याचा निर्णय घेत सामोपचाराने वादावर पडदा टाकला गेला. जोशी वाड्यात राहणारे नागरिक हे काही चाकरमानी, काही जण लहान व्यावसायिक तर काही नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे नागरिक आहेत.
नागरिकांनी दिली माहिती
जळगाव येथे श्रीराम मंदिर संस्थानचा रथोत्सव दरवर्षी कार्तिकी प्रबोधनी एकादशीला साजरा केला जातो. त्यानुसार मंगळवार, १२ रोजी शहरात श्रीराम रथाची मिरवणूक होती. त्यानुसार जोशी वाड्यातील लहान मुलांनीही तहान स्याची गल्लीत मिरवणूक काढली. फुलांची पाकळी ओट्यावर पडली. हे कारण साधुन एका गटाने जोशीवाड्धाला लक्ष्य केले. त्यानंतर दगडफेक करण्यास सुरुवात केली, अशी माहिती या ठिकाणी भेट दिली असता नागरिकांनी दिली. या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले असून नुकसानीमुळे व्यथित झाले आहेत. आदर्श आचार संहिता लागू असताना घडलेला प्रकार अक्षम्य किंवा दुर्लक्षित करण्यासारखाही नाही मुले स्थ उत्सव साजरा करताना केवळ आनंद व्यक्त करण्याची भावना होती. फुलांच्या पाकळी उधळण्यात ते जल्लोष करत होते. पाकळी ओट्यावर फेकण्याचे त्यांचे ध्यानीमनी नव्हते. अनावधानाने ती पाकळी पडली. आणि त्याचे भांडवल करून दगडफेक करणे, यामागील नेमके कारण काय? समजुतदारपणा घेतला असता तर मोठ्या घटनेला निमंत्रण मिळाले नसते. मात्र जोशीवाड्यावर मिती निर्माण करणे, अशी धारणा यातून दिसून आली, समाजात तेढ निर्माण करण्याचाही प्रयत्न झाला, असेही स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले. ही घटना अप्रिय आहेच, यापुढे अशा घटना घडू नये, या अनुषंगाने उपाय योजना आणि कृती करणे अपेक्षित आहे. समाजात मने क्लुषित करण्याचा खोडसाळपणा कोणाकडून होत असेल तर त्याला वेळीच अटकाव होणे आवश्यक आहे. जोशीवाड्यात पोलीस बंदोबस्त आहे. परिस्थिती शांत आहे. परंतु दुभंगलेली मने जोडण्याचा प्रयास सर्वांच्या जगण्यासाठी सुखद होईल, असा सूर बुधवार, १३ रोजी स्थानिकांनी व्यक्त केला. ही भावना सर्वांनी लक्षात घेण्यासारखी आहे.
रस्त्यावर दगड आले कोठून ?
या परिसरात भेट दिली असता सर्व रस्ते कॉक्रिटचे आहेत. मग मोठ्या प्रमाणात दगड आले कोठून ? याचा तपास होणे गरजेचे आहे. या भागातील लोकप्रतिनिधी छोट्या रथाच्या उत्साहाला गालबोट लावले गेले असता शांत आहेत ? याचे कारण काय ? याप्रश्नी पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आगामी काळ मतदानाचा आहे. दहशत निर्माण करणाऱ्यांना हुडकून कठोर कारवाई केली जावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
लहान मुले भयभित
दगड भिरकावित्याच्या प्रकाराने गल्लीतील मुलांची पळापळ झाली. ते मेदरले. व आमचे काय चुकले? असा प्रश्न त्यांनी त्यांच्या आई वडिलांसमोर घरी उपस्थित केला. संयमता, आणि मोठ्या मनाची वागणूक देण्याची भावना असती, तर फुलांच्या पाकळीवरुन मोठे स्वरुप देण्याची कृती घडली नसती? असे मत काही सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले