अमळनेरमध्ये दुकानदारावर दगडफेक; रोकड लुटली अन् पळ काढला, एकावर गुन्हा

तरुण भारत लाईव्ह न्यूज । २६ डिसेंबर २०२२ । अमळनेर शहरातील मिठाई विक्रेत्याला शिविगाळ करीत दुकानात दगड मारून रोकडसह मोबाईल ब्लूटूथ लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना 24 रोजी दुपारी अडीच वाजता घडली. या प्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सूत्रानुसार, न्यु जवेरचंद नाथालाल मिठाईवाला दुकानाचे संचालक विशाल सुनील खिलोसिया (34, शनी मंदिर, न्यू प्लॉट, अमळनेर) यांच्या तक्रारीनुसार, 24 रोजी दुपारी अडीच वाजता संशयीत तन्वीर शेख मुक्तार (अमळनेर) याने दादागिरी करीत दुकानात प्रवेश करीत दगड भिरकावल्याने घड्याळाचा काच फुटला तसेच दुसरा दगड उगारत जीवे ठार मारण्याची धमकी देत खिशातील 450 रुपयांची रोकड व 1200 रुपये किंमतीचे ब्लूटूथ हिसकावून पळ काढला. तपास नाईक कैलास पवार करीत आहेत.