जळगाव : जळगाव जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञाताने रेल्वे रुळांवर दगड ठेवल्याचे समोर आले असून, ही घटना वेळेत लक्षात आल्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे याप्रकरणी रेल्वे प्रशासनाने चौकशी सुरू केली असून, या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरादरम्यान असलेल्या म्हसावद रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे कर्मचाऱ्यांना दररोजच्या तपासणीदरम्यान रुळांवर दगड आढळून आले. हे दगड केवळ रुळांच्या बाजूला नव्हते, तर थेट दोन रुळांमध्ये अडकवले गेले होते. याबाबत रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. या भागातील संपूर्ण रुळांची तपासणी करून रेल्वेच्या यंत्रणांनी दगड हटवले. विशेषतः अपघात टाळण्यात रेल्वे कर्मचाऱ्यांना यश आलं आहे.
दरम्यान, हा प्रकार घडवून आणणाऱ्या व्यक्तींचा उद्देश काय होता, हे अद्याप अस्पष्ट आहे. हा प्रकार अपघात घडवण्यासाठी मुद्दाम केला होता का? की केवळ खोडसाळपणातून कोणी असं कृत्य केलं? याचा शोध रेल्वे प्रशासनाकडून घेतला जात आहे.
दररोज होते तपासणी
म्हसावद स्थानक परिसरात रेल्वे कर्मचाऱ्यांकडून दररोज तपासणी केली जाते. दररोजच्या तपासणीदरम्यान रुळांवर दगड आढळून आले. हे दगड केवळ रुळांच्या बाजूला नव्हते, तर थेट दोन रुळांमध्ये अडकवले गेले होते. याबाबत रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. या भागातील संपूर्ण रुळांची तपासणी करून रेल्वेच्या यंत्रणांनी दगड हटवले. विशेषतः अपघात टाळण्यात रेल्वे कर्मचाऱ्यांना यश आलं आहे.