प्रसिद्ध गायक सोनू निगम रविवारी संध्याकाळी दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (DTU) च्या अँजीफेस्ट २०२५ मध्ये गोंधळ उडाला. सोनू निगम परफॉर्म करत होते पण त्यांना मध्येच थांबवावे लागले. गर्दीतील एका गटाने स्टेजवर दगड आणि बाटल्या फेकण्यास सुरुवात केली.
सोनू निगम दिल्लीतील टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीत रविवारी परफॉर्मन्स देण्यासाठी गेला होता. पण, तिथे काही कारणाने राडा झाला आणि गायक सोनू निगमला आपला कार्यक्रम मध्येच थांबवावा लागला. लाखो विद्यार्थ्यांच्या गर्दीतील एका ग्रुपने स्टेजवर दगड आणि बाटल्या फेकणे सुरू केले, त्यामुळे त्याची टीम घाबरली.
या कार्यक्रमात एक लाखाहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. या दरम्यान प्रेक्षकांनी गायकावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. गोंधळ इतका वाढला की सोनू निगमने प्रेक्षकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
सोनू निगम म्हणाला, “मी तुमच्यासाठी येथे आलो आहे जेणेकरून आपण सर्वजण चांगला वेळ घालवू शकू. मी तुम्हाला आनंद घेण्यापासून रोखत नाही, परंतु कृपया असे करू नका.” सोनू म्हणाला की, त्याच्या टीममधील काही सदस्य जखमी झाले आहेत.