जळगाव : जिल्ह्यातील आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी व मल्हार कोळी या अनुसूचित जमातीचे प्रलंबित प्रमाणपत्राबाबत व प्रलंबित मागण्याबाबत अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठकीचे शुक्रवार, २६ रोजी आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार तसेच जिल्ह्यातील सातही प्रांताधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सने सहभागी झाले होते. दरम्यान, प्रांत अधिकाऱ्यांकडून आदिवासी टोकरे कोळी जमातीची पिळवणूक थांबवावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
अशा आहेत मागण्या
कुटुंबातील एका व्यक्तीला जर टोकरे कोळी जात प्रमाणपत्र मिळाले असेल तर कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची अडवणूक न करता जातीचा दाखला देण्यात यावा.
अनुसूचित जमातीचे टोकरे कोळी जात प्रमाणपत्र हे २००३ च्या कायदा नुसार देण्यात यावे.
३६-३६ च्या नोंद नुसार तसेच एल.सी.वर कोळी हा पुरावा ग्राह्य धरण्यात यावा.
६ बच्या इनाम वर्ग नोंदीवरून,हलके गाव कामगार,लँड एलीनेशन,बी टू सी प्रमाणपत्र देणे या विषयांवर चर्चा करण्यात आली.
अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
बैठकी दरम्यान आदिवासी टोकरे कोळी जमातीला सरकार कडून न्यायाची अपेक्षा असल्याचे भावना व्यक्त करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील सातही प्रांत अधिकारी यांनी आदिवासी टोकरे कोळी जमातीची पिळवणूक थांबवावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
यांची होती उपस्थिती
बैठकीला आंदोलनकर्ते प्रा.भाऊसाहेब सोनवणे, ऍड.अमित सोनवणे, जितेंद्र सपकाळे, बाळासाहेब सैनदाने, डॉ. श्रीधर साळुंके, भगवान सोनवणे, मंगला सोनवणे, बबलू सपकाळे, योगेश बाविस्कर, महेश सोनवणे, तुषार सैनदाने, गुलाब बाविस्कर, नितीन कांडेलकर, डीगंबर सपकाळे, नारायण बाविस्कर, पंकज रायसिंग, मदन शिरसाट, सुभाष सोनवणे आदी उपस्थित होते.