वादळाने प्रगतीशील तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू !

 

तरुण भारत लाईव्ह न्युज : निंभोरा ता. अमळनेर  बुधवारी १५ मार्च रोजी संध्याकाळी अचानक जोरदार वादळ सुटल्याने येथील तरुण शेतकरी सागर संजय धनगर (वय ३३) आपल्या घरी जात असताना वादळाने अंगावर झाडाची फांदी पडल्याने जबर जखमी झाला त्यातच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सविस्तर वृत्त असे की सागर उच्चशिक्षित मेकॅनिकल इंजिनिअर असून पुणे येथे एका नामांकित कंपनीत नोकरीवर होता पण गेल्या तीन  वर्षापासून आपल्या निंभोरा या गावी शेती करत होता.शेतात गोल भेंडी, डांगर असे नगदी पिकांचे उत्पन्न घेत होता. असेच यावर्षी शेतात त्याने चार एकर डांगर लावलेले आहेत.याच डांगराची गाडी भरून सागर डांगर मोजण्यासाठी दोन दिवसाआड होतेड येथे जात असे. अशीच एक गाडी भरून दुपारी चार वाजेनंतर हातेड येथे गेला होता.परतीत असताना संध्याकाळी अचानक वादळ सुरू झाले.त्यावेळी अमळगावच्या पुढे अंगावर झाडाची फांदी पडल्याने जबर जखमी झाला. त्यावेळी सागरला प्रथमोपचारासाठी अमळगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. पुढील उपचारासाठी सागरला अमळनेर  ग्रामीण रुग्णालयात आणले.  त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली असता त्याला मृत  घोषित केले. सागरच्या आकस्मित निधनाने निंभोरा गावावर शोककळा पसरली आहे. सागरच्या पश्चात त्याचे आई-वडील, पत्नी,मुलगा, भाऊ असा परिवार आहे. एका  प्रगतिशील शेतकऱ्याचा वादळाने जीव घेतला प्रशासन याची भरपाई करेल का ? असा नागरिक प्रश्न विचारत आहेत.