---Advertisement---
---Advertisement---
दास (लडाख): ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारताने दहशतवादाला पोसणा-यांची खैर असणार नाही असा कठोर संदेश जगाला दिला आहे, असे प्रतिपादन कारगिल विजय दिनानिमित्त लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शनिवारी केले. भविष्यात जगातील कोणत्याही शक्तीने भारताची एकता, अखंडत्व आणि सार्वभौमत्वाला आव्हान दिले तर त्यास चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असेही त्यांनी ठणकावले.
१९९९ च्या पाकिस्तान विरोधी कारगिल युद्धात विजय मिळवल्याच्या निमित्ताने लडाखच्या ग्रास येथे कारगिल युद्ध स्मारकास पुष्पांजली वाहत लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शहिदांना अभिवादन केले. त्यानंतर, पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा पाकिस्तानसाठी एक कठोर संदेश व एक धडा होता.
---Advertisement---
पहलगाम येथे हल्ला करीत भारताला जखमी केल्याबद्दलचे जशास तसे वे उत्तर होते. यावेळेस भारताने केवळ शोक व्यक्त केला नाही तर निर्णायक उत्तर दिले. भारताद्वारे शत्रूना उत्तर देणे ही आता सामान्य बाब बनली आहे. देशवासीयांनी दाखवलेला विश्वास व सरकारने दिलेली मोकळीक यामुळे भारतीय सैन्याने पाकिस्तानला चोख प्रत्यत्तर दिले, असे आहेत, असे लष्करप्रमुख म्हणाले.
लष्करप्रमुखांनी नमूद केले. ‘ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकवर जोरदार हल्ले केले. पण यात निर्दोष नागरिकांना नुकसान होऊ दिले नाही. तर पाकमधील ९ महत्त्वाच्या दहशतवादी तळांना नष्ट करण्यात आले. यात, आपल्या सैन्याला निर्णायक विजय मिळाला. याबरोबरच पाकिस्तानचे आक्रमक प्रयत्न हाणून पाडण्यात आल्याचे लष्करप्रमखांनी सांगितले. भारताने पाकिस्तानला शांतता राखण्याची संधी दिली होती. परंतु पाकने भ्याडपणा दाखवला. गेल्या ८ व ९ मे रोजी पाकच्या आगळिकीला भारताने प्रभावी उत्तर दिले. आपल्या लष्करातील वायुदल अभेद्य भिंत बनून उभे राहिले व पाकचे हल्ले हाणून पाडल्याचे त्यांनी ठळकपणे नमूद केले.