16 ऑगस्टला जळगाव जिल्हा बंदची हाक; जाणून घ्या काय आहे कारण ?

जळगाव : बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याक यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण सकल हिंदू समाज एकटवला आहे. या अत्याचारा विरोधात शुक्रवार, 16 ऑगस्ट रोजी संपूर्ण जळगाव जिल्हा कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. तरी या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन सकल हिंदू समाजाकडून करण्यात आले आहे.

बांगलादेशमध्ये घडत असलेल्या क्रूर कृत्याचा निषेध करण्यासाठी शुक्रवार 16 ऑगस्ट रोजी संपूर्ण जळगाव जिल्हा हा कळकळीत बंद पाडण्यात येणार आहे.  या बंदसाठी उस्फूर्तपणे सर्व व्यापारी बंधु, एमआयडीसी मधील लघु उद्योग भारती, पाईप आणि ठिबक असोसिएशन, मॅट असोसिएशन, एम सेक्टर चॅरिटेबल ट्रस्ट, भाजप उद्योग आघाडी, दाल मिल असोसिएशन,जिंदा भाजप व आघाडी,  बीजे मार्केट असोसिएशन, गोलानी मार्केट असोसिएशन, फुले मार्केट असोसिएशन, कोचिंग क्लास असोसिएशन, जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालय तसेच शहरातील विविध छोटे मोठे व्यापारी संघटनांकडून या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

स्वेच्छेने सर्व सकल हिंदू समाज एकजूट होऊन या दिवशी बंद ठेवणार आहे. जळगाव जिल्ह्यातील सकल हिंदू समाजाकडून आवाहन करण्यात येत आहे. या क्रूर कृत्याच्या निषेध म्हणून आपण एक दिवस आपला राष्ट्र व या धर्मकार्यासाठी बंद पाळायचा आहे.