जळगाव : शहरात लव्ह जिहाद स्टाईल प्रकाराचा भंडाफोड पोलिसांनी केला असून, दोघा मुस्लीम तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून काही साहित्य जप्त केले आहे. या दोघांकडून दाब्यात घेतलेल्या लॅपटॉपमधून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. तसेच त्यांनी बऱ्याच तरुणींना मुस्लीम असताना हिंदू असल्याची बतावणी करीत जाळ्यात ओढल्याचे प्रकारही समोर येत आहेत.
जिल्ह्यातून जळगाव शहरात आलेल्या या दोघा तरुणांनी पुढील शिक्षणासाठी शहरातील एका महाविद्यालयात प्रवेश घेतला. राहण्यासाठी त्यांनी आदर्शनगरात भाड्याने खोली घेतली. त्याच महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या २० वर्षीय विद्यार्थिनीशी दोघांनी मैत्री केली. तिच्यासोबत मोबाईलवर फोटोही काढले. त्यानंतर हेच फोटो व्हायरल करून बदनामी करू असा दम भरत या तरुणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
तरुणीची पोलिसात धाव
या दोघांच्या जाचाला कंटाळून पीडित तरुणीने पोलिसात धाव घेत आपबिती मांडली. याप्रकरणी मंगळवार, १४ रोजी रात्री रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. इमरान शब्बीर मन्याय (वय २३, रा. साक्री, जि. धुळे) तसेच इकबाल खान गौस मोहम्मद खान (वय २४, रा. पाथरी, जि. परभणी) या दोघा तरुणांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
शहरात प्रसिद्ध अशा महाविद्यालयात २० वर्षीय मुलगी शिक्षण घेतेय. महाविद्यालयाच्या कँटीनमध्ये तरुणी बसली होती. त्यावेळी इमरान याने तिच्याशी संवाद साधत ओळख केली. जॅक उर्फ सागर सोनवणे (रा. साक्री) असे त्याने त्याचे नाव सांगितले होते. तरुण आणि तरुणाने एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेतले.
दरम्यान, हे दोघे जण इंस्टाग्रामला भेटले. त्यावेळी तरुणाचे नाव इमू मन्यार असल्याची माहिती समोर आली. तरुणीने याबाबत विचारले असता मुस्लीम मुलांशी मुली बोलत नाही, म्हणून खोटे नाव सांगितले. अशी बतावणी करून स्वतःचे नाव इम्रान शब्बीर मन्यार असल्याची कबुली त्याने दिली.
फोन करून बोलविले तरुणीस
भेटीच्या तीन दिवसानंतर इमरान याने फोन करून तरुणीला भेटण्यास बोलावले. तरुणीने नकार दिला असता नातेवाईकांसह मैत्रिणींना फोटो व्हायरल करेल, असे सांगत इमरान याने तरुणीला दम भरला. यामुळे तरुणी घाबरली. भीतीच्या दडपणात तरुणी गेली असता त्याने तिच्यावर जबरी अत्याचार केला. ऑगस्ट- सप्टेंबर २०२२ मध्ये पुन्हा इमरान याने तरुणीला फोन करून अजिंठा चौफुली परिसरात एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलविले. तरुणीने मात्र स्पष्ट नकार दिला. त्यावेळी त्याने गेल्यावेळी आपल्या संबंधांचे फोटो माझा मित्र इकबाल याने काढले असून, ते व्हायरल करेल, असा दम भरला.
या ठिकाणीही त्याने तरुणीवर अत्याचार केला. फोटोचा आधार घेत आपल्याला ब्लॅकमेल केले जात असल्याचे लक्षात आल्यावर तरुणीने त्याच्याशी संबंध तोडले. त्याचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला. त्यानंतर इतरांच्या मोबाईलवरून तरुणीशी संपर्क साधत तू माझ्याशी संबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करेल, अशी धमकी इमरान सतत तरुणीला देत होता. पीडित तरुणीने बेतलेला हा प्रसंग तिच्या मैत्रिणीच्या कानावर टाकला. या मैत्रिणीने तिच्या भावाला उदभवलेला हा प्रकार सांगितला. मैत्रीण आणि तिच्या भावाने या तरुणीची भावनिक साद घातली. त्यांनतर पीडिता रामानंदनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली. तिच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी इमरान शब्बीर मन्यार तसेच इकबालखान गौस मोहम्मद या दोघांना ताब्यात घेतले. दोघांकडील मोबाईल, लॅपटॉप, दुचाकी आदि जप्त केले. न्यायालयाने या दोघांची पोलीस कोठडीत रवानगी केली. तपास सपोनि रोहिदास गभाले करीत आहेत.
धक्कादायक माहिती येतेय समोर
इमरान व इकबाल यांनी आणखी काही तरुणींना फसविले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांच्याकडून जप्त केलेल्या लॅपटॉपमधून काही छायाचित्रे व मुलींना फसविल्याचा प्रकार समोर येत असल्याचेही वृत्त आहे. मात्र यासंदर्भात पोलीस प्रशासनाकडून कमालीची गुप्तता पाळली जात आहे. लव्हजिहाद स्टाईल या प्रकारामुळे शहरात संतापाची लाट पसरली आहे.