पहिली ते पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार ७५ हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती, काय आहे योजना ?

#image_title

HDFC Bank Parivartans: समाजातील आर्थिक दृष्ट्या वंचित कुटुंबातील हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने एचडीएफसी बँकेने परिवर्तन शिष्यवृत्ती उपक्रम सुरु केला आहे. यात पहिलीपासून ते पदवीव्युत्तर पदवी पर्यंत शिक्षण घेणारे गुणवंत आणि गरजु विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.

या शिष्यवृत्तीनुसार ज्या विध्यर्थ्यांना वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकटांमुळे इतर कोणत्याही आर्थिक समस्यांमुळे शिक्षण घेऊ शकत नाहीत,अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार जास्तीत जास्त 75 हजार रुपयापर्यंतची आर्थिक मदत दिली जाणार आहे. इयत्ता पहिली पासून ते पदव्युत्तर पदवीपर्यंतचे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी 30 ऑक्टोबर 2024 हि शेवटची तारीख असणार आहे. यासाठी एचडीएफसी बँक परिवर्तन ईसीएसएस शिष्यवृत्ती 2024-25 साठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात आले आहेत.

शिष्यवृत्तीसाठी आवश्यक पात्रता
एचडीएफसी बँक परिवर्तन योजनेच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणारे उमेदवार इयत्ता पहिली ते बारावी सर्व शाखांसोबत डिप्लोमा आणि आयटीआय अभ्यासक्रम करणारे उमेदवार, आणि पदवी / पदव्युत्तर पदवीमध्ये शिक्षण घेत असणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीचा लाभ घेवू शकणार आहेत.

अर्ज करणार्‍या विद्यार्थ्याला मागील शैक्षणिक अभ्यासक्रम किंवा इयत्तेमध्ये ५५ टक्के किंवा त्याहून गुणांसह उत्तीर्ण झालेले असणे आवश्यक आहे.

या शिष्यवृत्तीसाठी साठी अर्ज करणार्‍या उमेदाराच्या पालकांचे मागील वर्षाचे उत्पन्न हे २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. उमेदवार हे भारत देशातील रहिवाशी असणे आवश्यक असणार आहेत

ही कागदपत्र आवश्यक
सदर शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याने पासपोर्ट साईट फोटो , मागील वर्षाचे गुणपत्रक, आधार कार्ड / मतदान कार्ड / वाहन चालविण्याचा परवाना , चालू वर्षाचे शाळा / महाविद्यालयाचे ओळखपत्र / बोनाफाईट / फीस पावती, पालकांचा उत्पनाचा दाखला ही कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे.