असोदा : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव यांच्यातर्फे माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी कला उत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कला उत्सवात असोदा सार्वजिनक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी यश प्राप्त केले आहे.
कला उत्सव स्पर्धेत सर्व माध्यमांच्या शाळांमधील नववी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत गायन,वादन, नृत्य, नाट्य, दृश्यकला पारंपरिक गोष्ट वाचन या सहा कलाप्रकारांचा समावेश होता. सार्वजनिक विद्यालय असोदा विद्यालयातील प्रज्ञा कापडणे, तृप्ती बिऱ्हाडे, कोमल नारखेडे,मोहिनी पाटील, रिया पाटील,धनश्री शिंपी या विद्यार्थिनींनीही या कला उत्सव स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.
दृश्यकला या प्रकारातील पर्यावरणपूरक शिल्प तयार करणे या प्रकारात धनश्री शिंपी या विद्यार्थिनीने नारळाच्या कवटी पासून घुबड बनवले होते. त्यात ती प्रथम क्रमांकाने यशस्वी झाली तर प्रज्ञा कापडणे या विद्यार्थिनीने नाट्य या स्पर्धा प्रकारातील एकांकिका या स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची भूमिका साकारत तृतीय क्रमांक मिळविला.
मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल, पर्यवेक्षक एल. जे. पाटील यांच्यातर्फे या विद्यार्थिनींचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.