पुणे : सध्या नाताळचा सण सुरु आहे सर्वत्र उत्साह आहे मात्र, याच उत्साहाचा फायदा घेत ख्रिस्ती प्रचारक जोरदार कामाला लागले आहेत. धर्मांतर हे उद्दीष्ट ठेवत समाजात अनेक धर्म प्रचारक कार्यरत आहेत. बंजारा समाजासाठी तांडा तिथे चर्च हे उद्दीष्ट ठेवत राज्य भरातले फादर दिनदुबळ्या माणसांना येशूची लेकरे बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत. अश्या प्रकारच्या काही घटना घडल्यामुळे हिंदू धर्मींयांमध्ये आता जागृती होत आहे. परिणामी जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यात गोद्री येथे हिंदू गोरबंजारा लभाणा समाजाच्या महाकुंभ भरत आहेत. या कुंभाला राज्यभरातून चार ते पाच लाख लोकं उपस्थित राहणार आहेत.
एकीकडे गोरगरीब दीनदुबळे यांना टार्गेट करत धर्मांतराचा प्रयत्न करणारे ख्रिस्ती प्रचारक आता उच्च शिक्षित आणि सधन नागरिकांच्या वस्तीत फिरू लागले आहेत विशेष म्हणजे, मनुष्य प्राण्यातील लोभ या अवगुणाचा वापर करत त्यांनी आता सुशिक्षितांनाही मोठंमोठी आमिषे दाखवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे मात्र, त्या ठिकाणी या ख्रिस्ती प्रचारकांना पळ काढावा लागला.
ही घटना विद्येचे माहेर घर असणार्या पुणे महानगरातील कोथरूड या उपनगरातील डहाणूकर कॉलनीत घडली. डहाणूकर कॉलनीत म्हणजे, पुण्यातली क्रीम सोसायटी अनेक नामवंत या परिसरात राहतात या परिसरातील एका चौकात दाताच्या डॉक्टर असणार्या महिलेने आपल्या व्यावसायिक पात्रतेचा उपयोग करून नागरिकांमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रचार केला. नाताळ निमित्त दुकानापुढे मोठा मांडव टाकला आणि येशू ख्रिस्ताचे चमत्कार सांगत गुणगान सुरु केले ख्रिस्ताची शिकवणूक अंगिकारली तर दातांचे उपचार पूर्णपणे मोफत करण्याची घोषणा केली या प्रकाराने डहाणूकर मध्ये खळबळ माजली सर्व नागरिक एकत्र आले त्यांनी या प्रकाराला तीव्र विरोध करत कार्यक्रम बंद पाडला.
या महिला डॉक्टरचे नाव मेरी मरियम वैगरे ख्रिश्चन नाव नसून ते चक्क पूर्ण हिंदू नाव आहे अलीकडच्या काळात धर्मांतर केल्यानंतर हिंदू नाव न बदलण्याचा फंडा सुरु झाला आहे परिणामी हिंदू धर्मींयांमध्ये घुसखोरी करणे सोपे जाते.
डहाणूकर कॉलनीतील नागरिकांनी जळगाव ‘तरुण भारत’ची बोलतांना सांगितले की, या प्रचाराचे फोटो आणि व्हिडिओ आम्ही काढले असून आमिष दाखवून धर्म प्रचार करणे चुकीचे आहे यापुढे अश्या अपप्रवृत्तींना आमच्या परिसरात थारा मिळणार नाही.
पहा विडिओ :