तरुण भारत लाईव्ह ।१७ जानेवारी २०२३। Nepal Yeti crash काही पूर्वापार गैरसमज दूर होऊन संक्रांत हे शुभपर्व असल्याचा निर्वाळा अनेक जाणकार देऊ लागले असताना आणि परंपरागत पद्धतीने संक्रांत साजरी करण्याच्या प्रथांना गोडव्याचा मुलामा चढत असताना अचानक कुठेतरी मिठाचा खडा लागावा आणि सारे काही बेचव होऊन जावे अशा एका अघटिताने परवाचा रविवार काळवंडून गेला. Nepal Yeti crash एखाद्यावर संक्रांत आली असा एक वाक्प्रचार आहे. संक्रांत ओढवणे म्हणजे काहीतरी नको असलेले काहीतरी घडणे असा एक अपसमज या वाक्प्रचारामुळे निर्माण झालेला होता. प्रत्यक्षात, संक्रांत हा परिवर्तनाचा, संक्रमणाचा काळ असल्याने परिवर्तनाची पहिली चाहूल त्या दिवशी सूर्याच्या उत्तरायण भ्रमणप्रारंभाच्या मुहूर्तावर लागते, अशी मूळची श्रद्धा यामुळे काहीशी गढूळच झाली होती. Nepal Yeti crash इंग्रजी दिनदर्शिकेच्या पहिल्या महिन्यातील हा पहिला सण संक्रमणाचा आणि परिवर्तनाचा काळ घेऊन येतो अशी समजूत असल्याने हा मुहूर्त गोड व्हावा आणि अशा अप्रिय समजुतींना मूठमाती मिळावी म्हणून तिळगूळ सेवनाची प्रथा आपल्याकडे रूढ आहे.
रविवारी सर्व जण परस्परांना तिळगूळ वाटून हा सण आनंदाने साजरा करत असताना हे अघटित घडले. Nepal Yeti crash स्वच्छ आकाशात विहरणा-या आणि नवी उंची गाठण्यासाठी ताकदीनिशी भरारी घेणा-या पतंगाचा दोरा अचानक काही अज्ञात कारणाने कापला जावा आणि उंची गाठण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याने केविलवाण्या अवस्थेत गटांगळ्या खात जमिनीच्या दिशेने हतबलपणे कोसळत सुटावे तसाच हा एक प्रकार रविवारी नेपाळच्या अवकाशात घडला. Nepal Yeti crash नेपाळच्या यति एअरलाईन्सचे एक विमान अशाच उंचीवर पोहोचले होते. संक्रांतीच्या मुहूर्तावर अवकाशात विहरणा-या पतंगांची उंची गाठल्याचा आनंद विमानातील प्रत्येकाच्या चेहèयावर दिसतही होता. Nepal Yeti crash भारतातील गाजीपूर येथील पाच तरुण याच विमानातून प्रवास करत होते. संक्रांतीच्या मुहूर्तावर पतंगांच्या भरारीची उंची प्रत्यक्ष गाठल्याचा त्यांचा आनंद त्या क्षणी बहुधा अनावर झाला असावा. विमान प्रवासात मोबाईल फोन बंद ठेवणे तांत्रिक सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असते. Nepal Yeti crash तसे न केल्यास विमानातील संदेशवहन यंत्रणांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात.
पण नेपाळ सहलीत उपभोगलेल्या आनंदाच्या भरात, विमान प्रवासात मोबाईल फोन बंद ठेवण्याच्या नियमांचे भान विसरून त्यातील काही प्रवाशांनी फेसबुक लाईव्ह केले. कदाचित त्यांनी आपल्या आनंदात आपल्या सुहृदांना, मित्रपरिवारासही सहभागी करून घेतले असावे. Nepal Yeti crash पण हा आनंद उधळण्याचा क्षण शिगेला पोहोचला असतानाच अचानक विमानाला काळ्याकभिन्न धुराने लपेटून घेतले. क्षणापूर्वी आनंद उधळणारा तो क्षण मागे पडला आणि काळजाचा थरकाप उडविणारी कभिन्न काळोखी आसपास दाटली. पुढच्या क्षणी सारे काही दिसेनासे झाले आणि काही कल्पना करण्याच्या आत विमानातील ७२ जणांना वेळी ज्वाळांच्या रूपाने कवेत लपेटून काळाने त्यांचा घास घेतला. Nepal Yeti crash नेपाळच्या यति एअरलाईन्सचे ते विमान कोसळल्याची बातमी वा-यासारखी उपखंडात पसरली आणि संक्रांतीचा उत्साहच काळवंडून गेला. या विमानाच्या कर्मचा-यांसह ७२ जिवांचा वर्तमानकाळदेखील पुसला गेला. पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले पोखरा गाव आणि अलिकडेच सुरू झालेला तेथील नवा विमानतळ आज काळवंडला आहे. Nepal Yeti crash काठमांडू विमानतळावरून सकाळी दहा वाजून ३२ मिनिटांनी या विमानाने पोखरा येथे जाण्यासाठी हवेत झेप घेतली आणि जेमतेम ३० मिनिटांच्या या प्रवासात अवघा वर्तमानकाळच भूतकाळात जमा झाला.
Nepal Yeti crash एटीआर ७२-५०० वर्गातील या विमानाने पंधरा वर्षांत नेपाळच्या आकाशात अनेक उड्डाणे केली होती. मात्र अलिकडे त्याची विश्वसनीयता संदिग्ध झाली होती, असे बोलले जाते. अशी विमाने लांब पल्ल्याच्या प्रवासाकरिता वापरली जात नाहीत. नेपाळमध्येही काठमांडू ते पोखरा या लहान प्रवासाचा पल्ला गाठण्यासाठीच हे विमान वापरले जात होते. Nepal Yeti crash पण तो पल्ला पूर्ण करण्यासाठी जेमतेम १० सेकंदांचा अवधी शिल्लक असतानाच विमान हवेत भरकटले, त्याने दिशा सोडली आणि काही समजण्याआधीच पेट घेत जमिनीवर कोसळले. धावपट्टीवर सुरक्षित उतरण्यासाठी फक्त दीड किलोमीटर अंतर बाकी असताना ही जीवघेणी दुर्घटना घडली. या विमानात सहवैमानिक म्हणून काम करणा-या अंजू नावाच्या तरुणीचे व्यावसायिक भविष्य या दुर्घटनेपासून केवळ दहा सेकंद अंतरावर उभे होते. Nepal Yeti crash दहा सेकंदांनंतर तिने विमान धावपट्टीवर सुरक्षित उतरविले असते, तर तिच्या आयुष्यातील बढतीचा सुवर्णक्षण तेथे प्रतीक्षा करत होता. जेमतेम दहा सेकंदांचा हा प्रवास तिने यशस्वी केला असता, तर तिला कप्तानपद मिळणार होते आणि अंजूच्या आयुष्याच्या एका स्वप्नाला सुखाची झालरही लागणार होती.
याआधी, १६ वर्षांपूर्वी, जून २००६ मध्ये एका दुर्दैवी विमान अपघातातच अंजूने आपला पती गमावला होता. Nepal Yeti crash तोदेखील यति एअरलाईन्समध्येच सहवैमानिक होता. तो आघात उराशी घेऊनच अंजू आपले भविष्य घडविण्याचे स्वप्न पाहत होती आणि ते स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण अगदी समोर येऊन ठाकलेला असतानाच अचानक धुरात काळवंडले, दिसेनासे झाले आणि अंजूचे अस्तित्वच पुसले गेले. Nepal Yeti crash नियतीचा हा सगळाच खेळ अनाकलनीय आणि स्तब्ध करून सोडणारा आहे. डोळ्यादेखत होत्याचे नव्हते होणे म्हणजे काय असते आणि काळासमोर सारे क्षुल्लक असते, याची दग्ध जाणीव करून देणा-या या घटनेने उभे उपखंड आज थरकापून गेले आहे. मुळात नेपाळ हा देशच पर्वतराजीने वेढलेला आणि विमानचालनाच्या कौशल्यास आव्हान देणारा असल्याने या देशात विमान दुर्घटनांचा इतिहासही जुनाच आहे. Nepal Yeti crash गेल्या ३० वर्षांत या देशात २८ मोठ्या विमान दुर्घटना घडल्या आणि ३०० हून अधिक जण प्राणास मुकले. गेल्या वर्षी, २९ मे २०२२ या दिवशी तारा एअरलाईन्सचे एक लहान विमान पोखरा येथील जुन्या विमानतळावरून हवेत झेपावले आणि मस्टॅँगजवळ दुर्घटनाग्रस्त झाले. त्यामध्ये विमानातील सर्व २२ जणांचा बळी गेला. Nepal Yeti crash त्याआधी २००० ते २०१९ या १९ वर्षांत १५ विमान दुर्घटना घडल्या.
Nepal Yeti crash २०१९ मध्ये पूर्व नेपाळमध्ये झालेल्या एका हेलिकॉप्टर अपघातात नेपाळच्या पर्यटन मंत्र्यांचाच मृत्यू ओढवला. त्याआधी बांगलादेशच्या एका विमानास नेपाळच्या काठमांडू विमानतळावरच झालेल्या अपघातात ५१ प्रवाशांचा काळाने घास घेतला होता. १९९२ मध्ये पाकिस्तान एअरलाईन्सच्या विमानास काठमांडूतच झालेल्या अपघातात १६७ लोकांचा मृत्यू झाला आणि नेपाळचे आकाश विमान प्रवाशांचे मृत्युदूत असल्याची भयभावना बळावली. Nepal Yeti crash पोखरा येथील या आंतरराष्ट्रीय विमानतळाची अलिकडेच चिनी कर्जातून उभारलेल्या निधीमधून निर्मिती करण्यात आली होती आणि दोन आठवड्यांपूर्वीच त्याचे उद्घाटन झाले होते. नेपाळसारख्या दुर्गम देशासाठी हवाई दळणवळण सेवेचा जगाशी संपर्क साधण्यास उपयोग होईल असा विश्वास त्या दिवशी पंतप्रधान प्रचंड यांनी बोलून दाखविला होता. Nepal Yeti crash पण नेपाळी विमानांतील सुरक्षिततेच्या तांत्रिक बाबींवरही अलिकडे अनेक प्रश्नचिन्हे देखील उमटविली जात होती. गेल्या काही वर्षांपासून युरोपियन युनियनने नेपाळी विमानांच्या हवाई वाहतुकीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने काही बंधनेही आणली होती. वस्तुत: पर्वतीय प्रदेशात हवाई वाहतूक, विमानोड्डाणे आणि विमानांचे सुरक्षित अवतरण ही मोठी आव्हाने असतात. Nepal Yeti crash नेपाळमधील विमानतळांवरून उड्डाण करणे आणि सुरक्षितपणे जमिनीवर उतरविण्यासाठी वैमानिकाचे सारे कौशल्य पणाला लावावे लागते.
असे असताना, विमानांच्या सुरक्षिततेची तांत्रिक कारणेच तकलादू असणे किंवा त्यावर प्रश्नचिन्हे असणे म्हणजे संकटांना आमंत्रण दिल्यासारखेच असते. Nepal Yeti crash अशा वेळी, सुरक्षित प्रवास हा केवळ दैवाच्या हवाल्यावरच राहतो आणि सुरक्षितपणे प्रवास पार पाडणे हा केवळ नशिबाचा खेळ ठरतो. युरोपियन युनियनच्या बंधनांनंतर नेपाळी हवाई वाहतुकीच्या तांत्रित त्रुटी तातडीने दूर व्हावयास हव्या होत्या. रविवारच्या अपघातग्रस्त विमानातही काही तांत्रिक त्रुटी होत्या, असे बोलले जात आहे. Nepal Yeti crash असा स्थितीत केवळ कमी पल्ल्याच्या प्रवासासाठी त्याचा वापर करण्याचा पर्याय शहाणपणाचा ठरत नाही, तर त्रुटी दूर करणे किंवा तसे शक्य नसेल तर प्रवाशांचा जीव पणाला लावण्याऐवजी तो पर्यायच बंद करणे यातच शहाणपणा होता. रविवारच्या अपघाताने ७२ जणांचा घास काळाने घेतला आहेच, पण ७२ कुटुंबांवर दुर्घटनेची संक्रांत कोसळली आहे. Nepal Yeti crash रविवारच्या दुर्घटनेनंतर आता त्रुटी पुन्हा पुढे येतीलच, पण त्या दूर करून सुरक्षिततेची हमी देण्याचा जबाबदारपणा दाखविला गेला पाहिजे. नेपाळवर पसरलेल्या या शोकाच्या सावटातून सावरण्याचे बळ संबंधितांना मिळावे व सुरक्षिततेच्या खबरदारीच्या सद्बुद्धीचा संचार सर्वत्र राहो, एवढीच अपेक्षा…!