---Advertisement---

Breaking : अचानक अंधारात रेल्वे पडली बंद ; तळोद्याच्या पठ्ठ्यांनी केला जुगाड, होतेय सर्वत्र कौतुक

by team
---Advertisement---
तळोदा :  गेल्या पंधरा दिवसांपासून तळोदा तालुक्यातील भाविक अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले होते. दरम्यान,   बुधवार  ३  रोजी उधमपुर एक्सप्रेस जम्मू तवी ते इंदोर रेल्वेने परतीचा प्रवास सुरू झाला होता.  त्यामुळे सर्वांची यात्रा सुखरूप होऊन, जो तो आपापल्या घरी परत येणार होते. परंतू रात्री ८. १०. मिनिटा दरम्यान लुधियाना जंक्शन ते जिंद जंक्शन दरम्यान रेल्वेच्या इंजिनपासुन चौथ्या डब्या खाली असलेला पॉवर ब्रेक पाईपला अचानक मोठा प्राणी  आदळल्याचा अंदाज रेल्वे चालक परदीप मीना यांना आला.  अचानक रेल्वे गाडी अज्ञात स्थळी चक्क अंधारमय वातावरणात थांबली.
दरम्यान अज्ञातस्थळी अचानक रेल्वे थांबल्याने रेल्वे गाडी मधील प्रवासी भयभीत झाले.  रेल्वे गाडीमध्ये बिघाड झाला असल्याचे तळोदा येथील हंसराज राजकुळे हे इंजिनियरीचे वर्कशापचे मालक आहेत यांना कळाले.  त्यांनी तात्काळ आपल्या तळोदा येथील प्रवाशांना सोबत घेऊन रेल्वे गाडीतील बिघाड शोधण्याचा प्रयत्न केला. त्यात रेल्वेच्या चौथ्या डब्या खालील लोखंडी पॉवर ब्रेक पाईप वाकला असल्याचे दिसले.  लोखंडी पॉवर ब्रेक पाईपला सरळ करण्यासाठी साहित्य लागणार,  अज्ञातस्थळी कोणत्याही प्रकारचे साहित्य उपलब्ध नसतांना देखील तळोद्यातील तरूण पठ्ठ्यांनी जुगाड करत संपुर्ण ताकद लावून तो वाकलेला पॉवर ब्रेक पाईप तात्पुरता पुढील स्टेशन येते तोवर सरळ केला. आणि रेल्वेचा पुढील प्रवास सुरू झाला. त्यामुळे असंख्य प्रवाशांच्या जीवात जीव आला.  हंसराज राजकुळे, रमेश मगरे, रवींद्र गाडे, योगेश साळी, कैलास शेंडे आदी युवकांचे कौतुक केले जात आहे.
  पुढच्या स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यां मार्फत पॉवर ब्रेक पाईप बदलण्यासाठी ट्रेन थांबविली.  त्यावेळेस त्यांच्या निदर्शनात आले की अगोदर ज्या लोकांनी पाईप प्रेशर पाईप जो फिटिंग केला होता तो व्यवस्थित होता. त्याच फिटिंगवर देखील ट्रेन पुढे निघू शकत होती. परंतु, आता त्याला पूर्णपणे दुरुस्त केल्यावर रेल्वे पुढें पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment