Suicide : विवाहितेने गळफास घेऊन संपली जीवन यात्रा

जळगाव : घरात एकांतवासात आतून दरवाजा बंद करत विवाहितेने दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. मंगळवार, ३० रोजी सायंकाळी ओमसाईनगर आव्हाणे शिवार येथे ही घटना घडली. राणी श्यामकांत देशमुख (वय ४४) असे मृत विवाहितेचे नाव आहे. विवाहितेच्या आत्महत्येचे कारण कळाले नाही. मात्र त्यांनी नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अनुमान लावला जात आहे.

राणी देशमुख तसेच त्यांची दोन मुले दुर्गेश, दर्शन आणि पती श्यामकांत देशमुख असे कुटुंब ओमसाईनगरात वास्तव्य करतात. देशमुख हे मुळ अडावद येथील रहिवासी आहेत. ते येथे एका कंपनीत कंपनीत कार्यरत आहेत. नेहमीप्रमाणे ते मंगळवारी कामानिमित्त घराबाहेर गेले. दुपारी विवाहितेने घराचा दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. मंगळवारी संध्याकाळी पती घरी आल्यानंतर त्यांना दरवाजा बंद दिसला. त्यांनी आवाज दिला असता प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी डोकावून पाहिले असता प्रकार समोर आला. तत्काळ त्यांनी खबर तालुका पोलस ठाण्यात दिली.

माहिती कळताच पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्यासह कर्मचारी रामकृष्ण इंगळे, अनिल फेगडे, अनिल मोरे यांनी धाव घेतली. विवाहितेचा मृतदेह उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविला. याठिकाणी वैद्यकीय तपासणी त्यांचा मृत्यू तीन वाजेपूर्वी झाला. घटना कळताच मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. या प्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.