Summer Tips : उन्हाळ्यात उष्माघातापासून कसा करावा बचाव; जाणून घ्या उपाय

उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. उन्हाळ्यात उष्माघात टाळण्यासाठी लोक आहारात विविध पदार्थांचा समावेश करू शकतात. शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणीयुक्त पदार्थ आहारामध्ये घेण्याचा प्रयत्न करा. उष्माघातापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तुम्ही पुढील  उपाय करू शकता. यामध्ये पुरेसे पाणी पिणे आणि सुती कपडे घालणे हे देखील महत्वाचे आहे. कारण हे तुमच्या शरीराचे तापमान राखण्यास मदत करतात.

सुती कपडे
उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आरोग्याची आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण नेहमीच सुती कपडे घातले पाहिजेत. उन्हाचा तडाखा टाळण्यासाठी सुती कपडे घाला. ते खूप हलके असतात. उन्हाळ्यासाठी तुम्ही हलके रंग निवडू शकता. या कपड्यांमध्ये तुम्हाला खूप आरामदायक वाटते. पांढऱ्या रंगामुळे शरीराचे तापमानही कायम राहते. यामुळे या हंगामात पांढऱ्या रंगाचे कपडे अधिक वापरा.

ताक
उन्हाळ्यात तुम्ही नियमितपणे एक ग्लास ताक घेऊ शकता. हे दुपारी जेवणासोबत घेता येते. हे उष्माघातापासून तुमचे संरक्षण करण्यास मदत करते. उन्हाळ्यात शरीराचे तापमान राखण्यास मदत करते. त्यात चांगले बॅक्टेरिया असतात. ते पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात. यामुळे या हंगामामध्ये जास्तीत-जास्त ताकाचे सेवन करा, विशेष म्हणजे ताक वाढलेले वजन कमी करण्यास मदत करते.

कांद्याची पेस्ट
उष्माघात टाळण्यासाठी कांद्याची पेस्ट वापरा कांद्याचा रस कपाळावर, कानाच्या मागे लावणे फायदेशीर ठरते. तसेच घराबाहेर पडताना कांदा सोबत ठेवा. आहारामध्ये जास्तीत-जास्त कांद्याचा समावेश करा. यामुळे शरीराचे तापमान चांगले राहण्यास मदत होते.

पाणी प्या
उन्हाळ्यात जास्त पाणी प्या. पाणी तुमच्या शरीराला चांगले हायड्रेट ठेवण्यास मदत करते, ते तुमची उर्जा टिकवून ठेवते. पाणी तुम्हाला हायड्रेट ठेवतेच पण ते तुमची त्वचा निरोगी ठेवते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. शरीर थंड ठेवते, उष्माघातापासून बचाव करण्यास मदत होते. पाणी प्यायल्याने उन्हापासून आराम मिळेल. यामुळे घराच्या बाहेर पडताना पाणीसोबतच ठेवा.

लस्सी 

उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी दिवसाची सुरुवात लस्सीने करा. जर तुम्हाला सकाळी लस्सी पिण्याची सवय नसेल तर दुपारी जेवणानंतरही तुम्ही लस्सी पिऊ शकता. यामुळे शरीर थंड राहून उष्णतेपासून आराम मिळेल.

दही

दही पोटासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे उन्हाळ्यात दही खावे. यामुळे शरीराचे पचनही चांगले होते.

कोकम सरबत

विशेषतः उन्हाळ्यात तुम्ही कोकम सरबत नक्की प्यावे. कोकम सरबत पचायलाही चांगला असतो. आणि यामुळे शरीरालाही थंडावा मिळतो.

लिंबूपाणी

उन्हाळा आला की शरीरात पाण्याची कमतरता भासते. अशा परिस्थितीत तुम्ही रोज लिंबूपाणी प्यावे. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण होते आणि लिंबातून व्हिटॅमिन सी मिळते. लिंबू पाणी पोटासाठी खूप फायदेशीर आहे.