Sun weak after Navratri : ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखला जाणारा सूर्य हा एका विशिष्ट कालावधीत एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. सूर्य सध्या कन्या राशीत प्रवेश करत असून नवरात्रीनंतर तूळ राशीत प्रवेश करेल. तूळ राशीत प्रवेश केल्यानंतर सूर्य दुर्बल होईल. नवरात्री ३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर पर्यंत चालेल. १७ ऑक्टोबर रोजी सूर्याचा तूळ राशीत प्रेवेश होईल. तूळ राशीतील हे सूर्याचे संक्रमण देश आणि जगावर तसेच मानवी जीवनावर परिणाम करेल. ज्योतिषीय गणनेनुसार सूर्याचे तूळ राशीत होणारे संक्रमण हे लोकांसाठी शुभ नसल्याचे ज्योतिष शास्त्रज्ञांनकडून सांगण्यात येत आहे.
ज्योतिषीनुसार सूर्य १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ०७ वाजून ५२ मिनिटांनी तूळ राशीत प्रवेश करेल. सूर्य तूळ राशीत प्रवेश करताच दुर्बल अवस्थेत जाईल. अशा परिस्थितीत सूर्याच्या प्रभावामुळे लोकांची ऊर्जा पातळी कमी होईल. हाडे किंवा त्वचेशी संबंधित आजारांमुळे त्रास होऊ शकतो. तसेच आर्थिक जीवनात चढ-उतार येतील. मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. कामात अडथळे येऊ शकतात. एकंदरीत हे संक्रमण आर्थिक, मानसिक आणि शारीरिक दृष्टिकोनातून शुभ नसल्याचे दिसून येते. या काळात सूर्याला जल अर्पण करणे सर्व राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य कोणत्याही राशीत सुमारे एक महिना भ्रमण करतो. अशा स्थितीत सूर्य १५ नोव्हेंबरपर्यंत तूळ राशीत राहील आणि १६ नोव्हेंबरला सकाळी ०७ वाजून ४१ मिनिटांनी वृश्चिक राशीत प्रवेश करेल.