Bhaubeej 2024 : रविवारी भाऊबीज, जाणून घ्या महत्त्व आणि मुहूर्त

#image_title

Bhaubeej 2024 : आनंदाचा आणि उत्साहाचा असा दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली आहे. दिवाळीतील आणखी एक महत्त्वाचा दिवस म्हणजे भाऊबीज. भावा- बहिणीच्या नात्याची वीण घट्ट करणारा दिवस. दिवाळीत भाऊ-बहि‍णींना विशेष आकर्षण असतं ते भाऊबीजेचं. दिवाळीची समाप्तीच भाऊबीजेने होते. दिवाळीनंतर कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज हा सण साजरा केला जातो, ज्याला यमद्वितीया असेही म्हणतात. चला तर मग जाणून घेऊया काय आहे भाऊबीजेच महत्त्व? आणि शुभ मुहूर्त.

भाऊबीजेचे महत्त्व
हिंदू धर्मात भाऊबीज हा सण प्रमुख आणि प्रसिद्ध सणांमध्ये केली जाते. भाऊबीजेचा सण हा बहीण आणि भावाचा सण आहे. या दिवशी लोक आपल्या भावंडांसोबत साजरे करतात. ते एकमेकांना भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात आणि एकमेकांवर खूप प्रेम करतात. हा सण आपल्याला सर्व प्रकारच्या वाईट शक्तीपासून वाचण्यासाठी आणि आपल्याला समृद्धी आणि दीर्घायुष्य प्रदान करण्यासाठी होतो. अस म्हणतात या दिवशी यम आपल्या बहिणीच्या घरी गेला होता. त्यावेळी बहिणीने दाखविलेल्या आदराने प्रसन्न होऊन  बहीण यमुनेला वरदान मागण्यास सांगितले. यमुना म्हणाली की, तू दरवर्षी या दिवशी माझ्या घरी ये आणि या दिवशी जी बहीण आपल्या भावाला औक्षण करील, ती तुला घाबरणार नाही. यमराजाने यमुनेला तसे वरदान दिले आणि याच दिवसापासून भाऊबीज उत्सवाला सुरुवात झाली. याबद्दल अशी देखील मान्यता आहे की, नरकासुराचा वध करुन भगवान श्रीकृष्ण द्वारकेत परतले होते. यावेळी त्यांची बहिण सुभद्रा हिने त्यांना फुले, मिठाई आणि दिवे लावून स्वागत केले होते. कपाळावर टिळा लावून दीर्घायुष्य प्राप्त होण्याची प्रार्थना केली होती.

भाऊबीजेचा शुभ मुहूर्त
कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीला 2 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजून 22 मिनिटांनी सुरु होईल. तर 3 नोव्हेंबरला रात्री 10 वाजून 6 मिनिटांनी संपेल. उदय तिथीनुसार भाऊबीजेचा सण हा 3 नोव्हेंबरला साजरा केला जाईल. 3 तारखेला सकाळी 11 वाजून 39 मिनिटांपर्यंत सौभाग्य योग राहिल. तर यानंतर शोभन योग असणार आहे. त्यामुळे भाऊरायाला ओवाळण्यासाठी पूजेची सर्वोत्तम वेळ ही सकाळी 11 वाजून 45 मिनिटांपर्यंत असेल.