---Advertisement---

एकमेकांना पाहताच अंतराळवीरांचा जल्लोष, सुनिता विल्यम्स 8 महिन्यांनी परतणार पृथ्वीवर

by team
---Advertisement---

अंतराळवीर सुनीता विल्यम्स जवळजवळ ८ महिन्यांनी पृथ्वीवर परतणार आहेत. नासा आणि एलोन मस्क यांच्या स्पेसएक्सची टीम अंतराळात पोहोचली आहे. नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स एका अतिशय लहान मोहिमेवर गेल्या होत्या, परंतु ८ महिने आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात अडकल्या होत्या. अखेर, क्रू-१० टीम त्यांच्यापर्यंत पोहचल्यामुळे त्यांच्या पृथ्वीवर परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नासाने अंतराळ स्थानकातला व्हिडीओ शेअर केलाय. त्यात दिसतं की बूच विल्मोर अंतराळ स्थानकाचा दरवाजा ओपन करतात. त्यानंतर एका पाठोपाठ एक क्रू१० मधील अंतराळवीर आत येतात. यानंतर सुनिता विल्यम्स हसत हसत त्यांचं स्वागत करते आणि फोटो काढते. 

क्रू-१० टीममध्ये ४ शास्त्रज्ञांचा समावेश आहे. यामध्ये नासाच्या अ‍ॅन मॅक्लेन आणि निकोल आयर्स, जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीच्या ताकुया ओनिशी आणि रोसकॉसमॉसच्या अंतराळवीर किरिल पेस्कोव्ह यांचा समावेश आहे. ही टीम रविवारी अंतराळ स्थानकावर पोहोचली.

१४ मार्च रोजी ही मोहीम सुरू करण्यात आली

शुक्रवारी ही मोहीम सुरू करण्यात आली. बॅरी विल्मोर यांना सुनीता विल्यम्ससह अंतराळ केंद्रातून परत आणण्यासाठी नासाने पर्यायी मार्ग निवडला. स्पेसएक्स फाल्कन ९ रॉकेटने फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून क्रू ड्रॅगन कॅप्सूल घेऊन उड्डाण केले. उड्डाणानंतर सुमारे १० मिनिटांनी, क्रू ड्रॅगन कॅप्सूल फाल्कन ९ रॉकेटच्या वरच्या टप्प्यापासून वेगळे झाले आणि स्पेसएक्सने पुष्टी केली की टीम अंतराळ स्थानकाकडे जात आहे. सध्या, हे अभियान आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात पोहोचले आहे.

सुनीता विल्यम्ससह एकूण ४ अंतराळवीर अंतराळ केंद्रातून परतणार आहेत. यामध्ये निक हेग, सुनीता विल्यम्स, बुच विल्मोर आणि अलेक्झांडर गोर्बुनोव्ह यांचा समावेश आहे. ड्रॅगन अंतराळयान या सर्व अंतराळवीरांना घेऊन येईल आणि १९ मार्चनंतर अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर रवाना होईल.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment