जळगाव : जिल्ह्यात दुचाकीसह व सोनसाखळी चोरीच्या जास्त घटना घडत आहेत. याबाबत पोलीस प्रशासन दक्ष्ा असून चोरट्यांवर कडक कारवाई करत आहेत. सण उत्सव साजरे करत असताना आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही. सोशल मीडियावरील संदेशामुळे कोणाच्या भावना दुखावतील असे कोणतेही कृत्य करु नये. गुन्हा हा गुन्हा असतो. त्यात लहान-मोठा असा भेद नाही. त्यामुळे कारवाईही कायद्यानुसारच होईल, असे मत जिल्हा पोलीस अधीक्ष्ाक एम. राजकुमार यांनी व्यक्त केले.
‘तरुण भारत’ कार्यालयात स्थापन केलेल्या गणेशाची आरती पोलीस अधीक्ष्ाक एम. राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याशी ‘तरुण भारत लाईव्ह’तर्फे संवाद साधला असता त्यांनी ही माहिती दिली.जिल्हा पोलीस दल आणि जळगावचे नागरिक यांचे एक चांगले बाँडीग आहे. पोलीस प्रशासनाकडून ज्या सूचना दिल्या जातात त्यांचे ते पालन करत सहकार्य करतात. गुन्हा हा केव्हाही घडू शकतो. त्याला निश्चित असा वेळकाळ नसतो. जसा पाऊस सुरू होतो, थंडीच्या दिवसात, पेरणीच्या दिवसात असे गुन्ह्याबाबत नसते. गुन्हा घडण्यासाठी खूप मोठे प्रबळ असे कारणच हवे असे नाही. अगदी किरकोळ कारणांवरूनही गुन्हा घडत असतो. कायद्याच्या भाषेत गुन्हा हा गुन्हाच असतो. त्यात फरक नसतो.
दुचाकी, मोबाईल चोरीच्या जास्त घटना
जळगावचा विचार करता दुचाकी, मोबाईल चोरीच्या घटनांचे प्रमाण जास्त आहे. त्याचा तपासही वेळोवेळी आमची यंत्रणा लावत असते. गुन्हा करणाऱ्याला वाटत असते की आपल्यापर्यंत पोलीस येणार नाहीत किंवा कोणताही पुरावा सोडला नाही. परंतु असे नसते. गुन्हा जेथे घडतो तेथे कोणता ना कोणता पुरावा असतोच. तो पुरावा शोधून तपासाची चक्रे वेगात फिरवून गुन्हेगाराला अटक केली जात असते. यासाठी वेळ लागत असतो.
एपीडीए कायदा सर्वात मोठे शस्त्र
शासनाने एमपीडीए कायदा हा पोलीसांसाठी सर्वात मोठे शस्त्र दिले आहे. त्याचा वापर हा योग्यपणे केला गेला पाहीजे. याबाबत आम्ही सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्ष्ाकांसह सर्व अधिकारी व कर्मचारी यांना याबाबत प्रशिक्ष्ाण देत असतो. यात या कायद्याची पूर्ण माहिती होते. या कायद्यानुसार कारवाई करताना तो खटला न्यायालयात सिध्द होऊन संबंधित संशयितावर योग्य ती शिक्ष्ाा होईल याकडे पाहिले जाते. जिल्ह्यात जानेवारीपासून आतापर्यंत 34 जणांवर या कायद्यानुसार कारवाई केली आहे. यात एका दारू विक्रेत्या महिलेचाही समावेश आहे. या कायद्याचा वापर करताना ज्यांच्याविरोधात जास्त केसेस दाखल आहेत. शिक्ष्ाा भोगून आल्यानंतरही ते परत तोच गुन्हा करत असतील तर त्यांच्यावर या कायद्यानुसार कारवाई करत असतो.
गणेशोत्सवाची परंपरा जोपासावी
गणेशोत्सव साजरा करताना माझ्यामुळे दुसऱ्याला त्रास होता कामा नये याची जाणिव प्रत्येकाने ठेवावी. घोषणा देताना किंवा सोशल मीडियावरील संदेशामुळे कोणाच्या भावना दुखावतील किंवा सामाजिक शांतता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य करू नये. गणेश दर्शनासाठी जात असताना वाहन रस्त्यावर किंवा कोठेही कसेही पार्क करणे चुकीचे आहे. योग्य ठिकाणी व दुसऱ्या कोणाला वाहन काढताना त्रास होणार नाही, जेथे वाहन लावत आहे त्या परिसरातील, त्या घरातील व्यक्तींना त्रास होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही.
गणेश मंडळाना आवाहन
पोलीस प्रशासनाने गणेश मंडळांना ज्या सूचना, अटी-शर्थी दिल्या आहेत त्यांचे तंतोतंत पालन करावे. त्यामुळे जळगाव शहराची गणेशोत्सवाची जी परंपरा आहे त्यास कोठेही बाधा पोहचणार नाही. याची काळजी प्रत्येकाने घ्ोत सर्व सण आनंदात साजरे करावे, असे आवाहनही पोलीस अधीक्ष्ाक एम. राजकुमार यांनी केले.
बँकेवरील दरोड्याचा तपास समाधानकारक
स्टेंट बँकेवरील दरोड्याचा त्वरीत लावलेला तपास ही एक समाधानाची बाब म्हणता येईल. स्टेट बँकेवरील दरोड्याचा तपास एक आव्हान होते. कारण ती बाब राज्यस्तरावरील झाली होती. मुद्देमालही मोठा होता. परंतु आमच्या सहकाऱ्यांनी चोवीस तासाच्या आत तपास करून दरोडेखोरांना मुद्देमालासह अटक केली. चोरीस गेलेला पूर्ण मुद्देमालही जप्त करण्यात आला. यामुळे जनतेचा आमच्यावरील विश्वास अधिक दृढ झाला.