जळगाव जिल्ह्यात ८४१ बालकांना ‘मिशन वात्सल्य’चा आधार

जळगाव : मिशन वात्सल्य योजना आहे. जिल्ह्यातील 841 बालकांना दरमाह 1100 रूपये प्रमाणे एका महिन्याला या बालकांना 9 लाख 25 हजार 100 रूपयांचा लाभ देण्यात येत आहे. त्यामुळे शासनाच्या या योजनेचा या बालकांना शिक्षण व उदरनिर्वाहासाठी मोठा आधार मिळाला आहे.

कोरोना काळात एक अथवा दोघे पालक गमावलेल्या बालकांच्या शालेय शुल्क, वसतिगृह शुल्क, शैक्षणिक साहित्य खरेदी या उद्देश्यासाठी मिशन वात्सल्य अंतर्गत अशा बालकांना निधी वितरित करण्यात येत आहे. यानुसार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी  या विभागाकडून 841 बालकांना याचा लाभ देण्यात आला आहे.  ज्या परिवारातील कर्ता पुरुष वा महिला यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्या पाल्यांना जिल्हा महिला व बालकल्याण विकास अधिकारी कार्यालयातून आर्थिक मदत मिळते.

जळगाव जिल्ह्यामध्ये कोरोना काळात आई आणि वडील दोघेही मृत्युमुखी पडले आहेत. किंवा आई किंवा वडील दोघांपैकी एक गमावलेले अशा 841 मुलांना ‘मिशन वात्सल्य‘ या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. जिल्हा महिला व बालकल्याण विकास अधिकारी कार्यालयातून कोरोना काळात 912 प्रकरणांची ऑनलाईन पध्दतीने रजिस्टे्रशन करण्यात आली. त्यापैकी 841 बालकांना लाभ मंजूर करण्यात आला आहे. उर्वरित 71 प्रकरणात 27 प्रकरणातील लाभार्थी हे उपस्थित राहिलेले नाहीत. 44 प्रकरणांतील लाभार्थ्यांना दुसर्‍या योजनेव्दारे लाभ देण्यात आला आहे.

बाल न्याय निधी अंतर्गत 887 अर्ज प्राप्त झाले असून 737 प्रकरणांना मंजूरी देण्यात आली आहे. या प्रकरणांना जिल्हा कृती दलात जिल्हाधिकारी यांची मान्यता घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येत असते.

कोरोना काळात जिल्हा महिला व बालकल्याण विकास अधिकारी कार्यालयातून एका लाभार्थ्यांला प्रती महिना 1100 रूपयांप्रमाणे वर्षभरात 13 हजार 200 रुपये अदा करण्यात येत आहे. यानुसार 841 बालकांना एकत्रित 9 लाख 25 हजार 100 रूपयांचा लाभ मिळत आहे.