Supreme Court : बाबा रामदेव यांना सुप्रीम कोर्टाने बजावली अवमानाची नोटीस, कोर्टात हाजीर होण्याचे दिले आदेश

पतंजली आयुर्वेदच्या जाहिरातींमध्ये ॲलोपॅथिक औषधासारख्या प्रभावाचे खोटे दावे त्याच्या उत्पादनांमधून केले जातात असा आरोप करत इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. पतंजली आयुर्वेदाला याआधी (२७ फेब्रुवारी २०२४) त्याच्या उत्पादनांबद्दल आणि त्यांच्या औषधी परिणामांबद्दलच्या दाव्यांसाठी सुप्रीम कोर्टाकडून  फटकारण्यात आले होते.

मंगळवारी (19 मार्च 2024) सर्वोच्च न्यायालयाने पतंजली प्रकरणावर सुनावणी करताना बाबा रामदेव यांना अवमान नोटीस जारी केली. न्यायालयाने बाबा रामदेव यांना दोन आठवड्यांनी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. रामदेव बाबा यांच्यासोबतच न्यायालयाने पतंजली आयुर्वेदाचे एमडी आचार्य बाळकृष्ण यांनाही समन्स बजावले आहे.