कफ सिरप प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

---Advertisement---

 


नवी दिल्ली : कफ सिरपमळे लहान मुलांच्या झालेल्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये विषारी कफ सिरपमुळे अनेक मुलांचा मृत्यू झाला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

तथापि, न्यायालयाने याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला. सिरपमुळे झालेल्या मुलांच्या मृत्यूंबाबतच्या याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाने गुरुवारी सहमती दर्शविली. याचिकेत अनेक मुद्दे मांडले गेले; त्यात सीबीआय चौकशीची विनंतीही करण्यात आली, परंतु न्यायालयाने नकार दिला.

सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्या. के. विनोद चंद्रन यांच्या न्यायासनाने याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला. हा एक प्रकारचा निष्काळजीपणा आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता चौकशी आणि जबाबदारी सुनिश्चित करण्याची विनंती याचिकाकत्यनि न्यायालयाला केली होती.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---