जळगाव : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा देताच त्यांच्या जळगाव येथील ७ शिवाजी नगर या निवास्थानी आज शनिवार, ११ रोजी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी भेट घेतली. यात संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, लक्ष्मण पाटील, भाऊसाहेब पाटील, विराज कावडीया आदी उपस्थित होते.
संजय सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना आपली भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, सुरेशदादा हे आमचे कायम मार्गदर्शक आहेत आणि असलतील अशी भूमिका व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, माझे दादांसोबत राजकारणापुरते मर्यदित नसून ते कौटूंबिक आहेत. मी मागील १५-२० वर्षांपासून दादांचे काम पहिले आहे, कामाची पद्धत पहिली आहे, पण मानसिक तणावातून काम करण्यापेक्षा कुठेतरी लोक त्यांच्यावर संशय घेत असल्याने त्यांना त्रास होतोय. मागील काही दिवसांपासून काही घडामोडी होऊन दादांवर दबाव आणला जात आहे. दादा कायम आमचे मार्गदर्शक म्हणून आहे. त्याच्यामुळे दादांना भेटायला आलो होतो. दादांनी जरी शिवसेनेचा प्राथमिक सदस्यता राजीनामा दिला असेल मला माहिती आहे ते कोणत्या मनस्थितीत चालले. कारण मी दादांना गेले पंधरा ते वीस वर्षे जवळून पाहिलेला आहे, दादांचं काम पाहिले आहे. दादांचे कामाची पद्धत पहिली आहे. कुठेतरी लोक वेगवेगळ्या प्रकारे संशय घेत असल्याने त्यांना त्रास होतोय. काही दिवसांपासून ज्या पद्धतीने दादांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासंदर्भात काही तासात काही गोष्टी कळतील. मी स्वतः भेटायला आलो होतो आणि याच्यापुढे सुद्धा मला मार्गदर्शन लाभेल. आशीर्वाद लागेल कोणाचे दबाव आहेत कोणी फक्त दादांचा राजीनामा आल्यानंतर पटकन आता भाजपमध्ये येणार. परंतु, दादांनी सांगितलं की, मी कुठल्याही पक्षात जाणार नाही. या वयात माझे वडील जरी असते तरी त्यांना सुद्धा माझ्यासारख्या मुलांनी सांगितलं असतं की बाबा आपला उर्वरित आयुष्य तणावाखाली काढण्यापेक्षा आपण आपल्या कुटुंबासोबत राहावं ही प्रत्येक मुलाची इच्छा असते. त्याप्रमाणे जर दादांच्या मुलांनी या कुटुंबाची इच्छा व्यक्त केली असेल तर मला वाटतं त्या काही वावग वाटत नाही.