---Advertisement---

Surya Grahan 2025 : सूर्यग्रहण ‘या’ ३ राशींसाठी ठरणार धोकादायक, यात तुमची रास तर नाही?

by team
---Advertisement---

Chandra Grahan And Surya Grahan 2025 : या वर्षातील मार्च महिन्याला सुरुवात झाली असून अवघ्या काही दिवसांवर होळीचा सण आला आहे. २०२५ वर्षातील पहिलं चंद्र ग्रहण १४ मार्च रोजी शुक्रवारी फाल्गुन पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी लागणार आहे. या दिवशीच होलिका दहन होणार आहे. हे ग्रहण सकाळी १० वाजून ३९ मिनिटांनी सुरु होणार आहे. हे ग्रहण दुपारी २ वाजून १८ मिनिटांनी संपेल. मात्र, भारतात हे चंद्र ग्रहण दिसणार नाही. त्यानंतर मराठी नवं वर्ष गुढीपाडव्याचा सण असणार आहे. गुढीपाडव्याच्या एका दिवसापूर्वी या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण असणार आहे. अशात या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे काही राशींसाठी धोकादायक ठरणार आहे. गुढीपाडव्याचा सण ३० मार्च २०२५ ला रविवारी असणार आहे. गुढीपाडव्याच्या आधल्या दिवशी शनिवारी २९ मार्च २०२५ ला सूर्यग्रहण असणार आहे. सूर्यग्रहणामुळे काही राशीच्या लोकांवर नकारात्मक परिणाम होणार आहे. जाणून घ्या यात तुमची रास तर नाही ना .

मेष
मेष राशीच्या लोकांवर सूर्यग्रहणाचा प्रभाव दिसून येईल. यामुळे मेष राशीच्या लोकांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. करिअर आणि नोकरीमध्ये अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे तुम्ही चिंतेत राहू शकता. प्रेम जीवनात ब्रेकअप होऊ शकतो; विवाहित जोडप्यांमध्ये वाद होऊ शकतात.

कर्क
वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणानंतर कर्क राशीच्या लोकांना करिअर आणि नोकरीत आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. व्यावसायिकांचे पैसे कुठेतरी अडकू शकतात, ज्यामुळे तुम्ही काळजीत पडू शकता आणि तणावात राहू शकता. अनावश्यक खर्चापासून स्वतःला दूर ठेवा. कोणत्याही प्रकारच्या वादापासून स्वतःला दूर ठेवा. वैवाहिक जीवनात, तुमच्या जोडीदाराशी गोड बोला.

मीन
वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणामुळे मीन राशीच्या लोकांना अडचणी येऊ शकतात. या काळात, तुमचे मन शांत करा आणि योग आणि ध्यानाची मदत घ्या. कामाच्या ठिकाणी बॉस आणि वरिष्ठांशी संबंध बिघडू शकतात. तुमच्या कुटुंबाला वेळ द्या. लग्नाची तयारी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ कठीण असेल. तुमच्या प्रेम जीवनात प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचला. कोणत्याही प्रकारची घाई करू नका.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment