अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्याप्रकरणी एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. राजपूतने 14 जून 2020 मध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. मात्र, ही आत्महत्या नसून हत्याचं असल्याचं अनेकदा सांगण्यात आलं. सुशांत आत्महत्याप्रकरणी आजही अनेक अशा गोष्टी समोर येत आहेत, ज्या थक्क करणाऱ्या आहेत. सुशांतच्या निधनानंतर त्याला कूपर रुग्णालयात शविच्छेदनासाठी दाखल करण्यात आलं. आता जवळपास अडीच वर्षांनी अभिनेत्याचं शवविच्छेद करणाऱ्या रुपकुमार शाह यांनी आत्महत्या नव्हे हत्याच आहे, असा खळबळजनक दावा केला आहे.
या रुग्णालयाच्या शवागृहात काम करणाऱ्या रुपकुमार शाह यांचा हा दावा आहे. सुशांतचा मृतदेह आला तेव्हा त्याच्या मृतदेहावर जखमा होत्या, शरीराला मुका मार लागला होता, असंही शाह यांनी सांगितलं आहे.
रुपकुमार शाह हे कूपर रुग्णालयातल्या शवागृहातच काम करत होते. दीड महिन्यांपूर्वी ते निवृत्त झाले आहेत. त्यानंतर त्यांनी या विषयी खुलासा केला आहे.