जळगाव : रेल्वेची आरक्षीत तिकीटांचा काळाबाजार करीत असल्याची माहिती आरपीएफ पथकाला मिळाली होती. त्यानुसार आरपीएफ व जळगाव शहर पोलीस यांच्या पथकाच्या कारवाई केली. यात विकास केदारनाथ बिर्ला, नामक संशयिताने रेल्वे आरक्षण ई-तिकिटांच्या अवैध व्यापार करीत असल्याचे मान्य केले. यावरून रेल्वे कायदा कलमान्वये अटक करीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या संशयीत आरोपींना रेल्वे न्यायालय, भुसावळ येथे हजर करण्यात आले.
रेल्व्ो ऑनलाईन आरक्षीत तिकीटांच काळाबाजार करीत असल्याच्या माहितीवरून विजयकुमार आदित्यराम वालेचा, वय 57 वर्षे यास ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या जबाबानुसार शहर पोलिस जळगाव व आरपीएफ पथकाने निखिल एजन्सी नावाच्या दुकानावर छापा टाकला असता या कारवाईत 11हजार 788.9रूपये किमतीची 53 आगामी तारखेची व 1 लाख 56 हजार 566.08 पैसे या रकमेची 56 आरक्षीत असे एकूण 1 लाख 68हजार 354.98 रूपयेची रेल्वे ई आरक्षण तिकीटे आढळून आली. यात विकास केदारनाथ बिर्ला, वय 61 वर्षे, घर क्र. 4, नवी पेठ जळगाव हि व्यक्ती अधिकृत एजंट आहे. त्यांच्या मोबाईल क्रमांक 9422225106 वरून एजंट आयडी 01691 आणि 01505 नुसार गरजू लोकांना रेल्वे ई-रिझर्वेशन तिकिटे मिळवून देतो. त्यांनी 21081980, 98230, 2709, 902137, 973055330, 8087710, 911209, 911209, 9161951950, वैयक्तिक वापरकर्ता आयडी तयार केले असून तपासणी दरम्यान त्यांच्या दुकानात प्रिंटर नसल्यामुळे त्यांना आरपीएफ जळगाव पोलीस ठाण्यात आणले असता आयआरसीटीसी वेबसाइटवर पासवर्ड टाकल्यानंतर तपासताना, 11,788.9/ आगामी ई-तिकिटांचे 53 आणि 156566.08/- च्या 53 टप्पे असे आरक्षित तिकिटे आणि एकूण किंमत रु. 1,68,354.98/- सापडली, एस.बी. चौधरी यांनी 3 आगामी रेल्वे आरक्षण तिकिटे आणि रियलमी कंपनीचे मोबाईल फोन जप्त केले. त्यानुसा संशयितांना अटक करीत रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास एसबीआय चौधरी आरपीएफ पोलीस स्टेशन जळगाव करीत असून संशयीत आरोपींना रेल्वे न्यायालय, भुसावळ येथे हजर करण्यात आले.