---Advertisement---
तळोदा तालुक्यातील सतोना परिसरात एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना आत्महत्या आहे की खून, याबाबत अद्याप स्पष्टता नसून पोलीस तपास सुरू आहे. विशेष म्हणजे, अल्पावधीत घडलेली ही दुसरी घटना असल्याने स्थानिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
मृत व्यक्तीची ओळख कांतीलाल मोतीराम वळवी (वय अंदाजे ५०, रा. वालंबा, गुजरात) अशी झाली आहे. ते विनोद मंगा वळवी यांच्या सतोना शिवारातील शेतात दि. २६ रोजी दुपारी १२ ते २ वाजण्याच्या दरम्यान मृत अवस्थेत आढळून आले. ही बाब समजताच परिसरात एकच खळबळ माजली.
घटनेची माहिती मिळताच तळोदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पुढील तपासासाठी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणात मृत्यूचे नेमके कारण समोर येण्यासाठी पोलीस तपास करत असून, पुढील अहवालानंतरच मृत्यूमागील सत्य स्पष्ट होणार आहे.









