स्वप्नील जोशीचं गुजराती सिनेइंडस्ट्रीत पदार्पण, सिनेमाचं नाव काय ?

#image_title

मराठी सिनेइंडस्ट्रीचा चॉकलेट बॉय म्हणजेच अभिनेता स्वप्नील जोशीने गुजराती सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले आहे. स्वप्नील गुजराती सिनेमामधूनही प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. ‘शुभचिंतक’ हा गुजराती सिनेमा 2025 मध्ये रिलीज होणार आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ओळखला जाणारा स्वप्नील जोशी गुजराती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘शुभचिंतक’ चित्रपटाची निर्मिती पार्थिव गोहिल आणि मानसी पारेख त्यांच्या सोल सूत्र या बॅनरखाली करत आहे. गोलकेरी, कच्छ एक्स्प्रेस आणि झामकुडी या गाजलेल्या हिट चित्रपटांनंतर त्यांची ही चौथी निर्मिती असणार आहे. निसर्ग वैद्य दिग्दर्शित ज्यांनी यापूर्वी ज्येष्ठ अभिनेते सिद्धार्थ रांदेरियासोबत गुजराती चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.त्यांनी हा चित्रपट डार्क कॉमेडी थ्रिलर असल्याचे सांगितले.

काय म्हणाला स्वप्नील जोशी ?

स्वप्नील जोशी म्हणाला, “गुजराती चित्रपट उद्योग वेगाने विकसित होत आहे आणि वैविध्यपूर्ण विषयांची निर्मिती करत आहे जी दूरवरच्या प्रेक्षकांना ऐकू येते आहे. सिनेमाची जादू सार्वत्रिक असावी यावर माझा नेहमीच विश्वास आहे. एक कलाकार म्हणून ही संधी माझ्यासाठी नक्कीच खास आहे आणि गुजराती चित्रपट विश्वात काहीतरी वेगळे निमित्ताने करायला मिळतेय याचा आनंद आहे. मी नेहमीच मानसीची एक अभिनेत्री म्हणून प्रशंसा केली आहे आणि तिच्यासोबत काम करण्याची माझी इच्छा पूर्ण होत आहे. या भूमिकेने मला नक्कीच आव्हान दिल आहे आणि ही भूमिका साकारण्यासाठी मी उस्तुक आहे”