---Advertisement---
पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाकडून येथील धर्मांतरण घडवणाऱ्या टोळीला निधी मिळायचा, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या टोळीचे काम आंतरराष्ट्रीय निधीवर चालायचे. तोयबाकडून मिळणारा निधी संयुक्त अरब अमिरात, कॅनडा, लंडन आणि अमेरिकेच्या मागनि भारतात पाठवला जायता, अशी माहिती तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी दिली. या पैशांमधून देशभरात धर्मांतरण घडवणे आणि मुलींचे ब्रेनवॉश करून एक मोठे नेटवर्क उभारण्यात आले होते.
या टोळीला पैशांचा पुरवठा गोव्यात राहणारी आयशा उर्फ एस. बी. कृष्णा करायची. तिला पोलिसांनी अटक केली आहे. विदेशातून येणारा निधी देशभरात वितरित करण्याचे काम आयशा करायची. कॅनडातील सैयद दाऊद अहमद हा आयशाच्या खात्यांमध्ये हा निधी हस्तांतरित करायचा, अशी माहिती तपासात समोर आली.
आयशाचा पती शेखर राय ऊर्फ हसन अली कोलकाता येथून काम करायचा. तो या टोळीचा कायदेशीर सल्लागार होता. त्याच्या मुसक्याही आवळण्यात आल्या आहेत. धर्मांतरणाशी निगडित सर्व कायदेशीर दस्तावेज तयार करणे आणि कागदोपत्री कामकाज पूर्ण करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती.
कुरेशी-ओसामा धोकादायक
अब्दुल रहमान कुरेशी हा या टोळीतील सर्वांत धोकादायक सदस्य आहे. तो मूळचा आग्रा येथील आहे. युट्यूब वाहिनी आणि समाज माध्यमाच्या मदतीने तो अल्पवयीन मुलींचे ब्रेनवॉश करायचा. इस्लामिक शिक्षणाच्या नावाखाली तो मुलींना कट्टरवादी करायचा आणि नंतर जिहादी विचारधारेसोबत जोडायचा, असे अधिका-यांनी सांगितले. कोलकात्यात अटक केलेला ओसामाची भूमिकाही महत्त्वपूर्ण होती. ते दोघे मुलींवर मानसिक आघात करायचे, त्यांच्या कुटुंबापासून दूर करायचा. मुलींसाठी खोटे नाव-पत्ता तसेच पूर्वीपासून सक्रिय असलेल्या सिम कार्ड्सची व्यवस्था करायचा. त्यांचा माग लागू नये म्हणून हा खटाटोप असायचा.
देशभरात लव्ह जिहादचे जाळे
ब्रेनवॉश करण्यात आलेल्या मुलींना पहिले दिल्लीला आणले जायचे आणि नंतर वेगवेगळचा ठिकाणी पाठवले जायचे. लोकेशन ट्रेस होण्याची भीती असल्याने मुलींना हलवण्यासाठी ट्रेनचा वापर अजिबात केला जायचा नाही. दिल्लीत आलेल्या मुलींना उत्तर भारतातील इतर राज्यांमध्ये पाठवले जायचे. ही टोळी इसिसच्या कार्यपद्धतीने काम करायची. या टोळीने देशभरात लव्ह जिहाद आणि धर्मांतरणाचे जाळे विणले होते. तपास यंत्रणा या टोळीची पाळेमुळे खोदत आहेत, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.