जळगाव : गुजरात राज्यातुन मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्यात किटकनाशक, बुरशीनाशक, अळीनाशक, तणनाशक आदी औषधी बाजारात विकली जात आहे. बाजारात सद्यस्थितीतील औषधे ही बनावट नावाने विकली जात आहेत किंवा त्या औषधामधील घटकाचा वापर करून बनवल्या जात आहे. अश्या पध्दतीने औषधींचा काळाबाजार करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन शुक्रवारी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांच्या नेतृत्वखाली जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
किटकनाशक, बुरशीनाशक, अळीनाशक, तणनाशक आदी औषधीचा काळाबाजार केला जात आहे. या किटकनाशकात पिकांवर चांगला रिझल्ट मिळावा याकरिता मोठ्या प्रमाणात विषारी घटकाचा वापर करण्यात येतो. परंतु, याचा मातीसह मानवी आरोग्यावर याचा मोठा धोका निर्माण होत आहे. त्याचे दुष्परिणाम आपल्याला वेगवेगळया आजारातून पाहायला मिळत आहे. आपण बनावट किटकनाशके विक्री करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदन देताना महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जळगाव तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील, तालुका संघटक विलास सोनार, तालुका सचिव मनोज लोहार, शहर सचिव हर्षल वाणी, संदिप मांडोळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.