अडकमोल कुटुंबाला समाजातून बहिष्कृत करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा

तरुण भारत लाईव्ह न्यूज । समाजामध्ये तेढ निर्माण करणारे व अडकमोल कुटुंबाला बहिकृत करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आ.) महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी कुटुंबियांसह लाक्षणिक उपोषण करून जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आ.) गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाचा आशय असा की, दि. १६ मार्च २०२३ रोजी दिक्षित वाडी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा पुर्णाकृती पुतळा स्थलांतरीत करण्यात आले असता समाज बांधवांच्या जोरदार विरोध केल्याने आहे त्याच ठिकाणी वरील पुतळे पुन्हा विधीवत बसविण्यात आलेत. त्यानंतर संबंधित जागे संदर्भात दि. २८ मार्च २०२३ रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हा पोलीस अधिक्षक, मनपा आयुक्त तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या समवेत बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक संपल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातील कॅन्टीन परीसरात एका वाहीनीला मुकुंद सपकाळे, राजु सुर्यवंशी, जगन सोनवणे यांनी माझ्या बाबतीत कोणतेही ठोस पुरावे नसतांना अनिल अडकमोल या कटामध्ये सामील असल्याचे जाहीर वक्तव्य करून त्यांना समाजातून बहीष्कृत करावे असे आवाहन केले. या प्रकाराने माझे परीवारावर फार मोठा आघात झालेला आहे. समाजामध्ये तेढ निर्माण करणारे व बहीष्कृत करण्याच्या वृत्तीने त्यांनी केलेल्या कृत्यामुळे फार मोठी मानहानी झालेली आहे. भारतीय संविधानानुसार कोणत्याही माणसावर बहीष्कार केला जात नसुन अश्या माणसांविरुद्ध भा.दं.वि. कलम ५०० व ५०१ प्रमाणे गुन्हा दाखल करून तिघांवर कायादेशीर कठोर कारवाई करण्यात यावी मागणीसाठी अडकमोल कुटुंबिय एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. याप्रसंगी भरत मोरे, प्रताप बनसोडे, किरण अडकमोल, अनिल लोढे, अशोक धामणे, विक्रम शेजोळे, विशाल महाले, सुरेश चौथमल, ज्ञानेश्वर आहिरे, कैलास मिस्तरी, सुनील बनसोडे आदी उपस्थित होते.