---Advertisement---
अमळनेर : तालुक्यासह शहरातून जाणाऱ्या बोरी नदीवरील पारोळा तालुक्याची तहान भागविणारे तामसवाडी येथील बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या पावसामुळे बोरी धरणात पाण्याची आवक सुरु आहे.
पाण्याची आवक वाढल्याने बोरी धारण सध्या ९८.६० टक्के भरले आहे. पाण्याची आवक अशीच सुरू राहिल्यास कधीही नदीपात्रात पाणी सोडण्यात येईल असा इशारा पाटबंधारे उपविभाग जळगाव यांनी दिला आहे.
ऐन वेळेस कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये व कोणतेही जीवित तसेच वित्त हानी होऊ नये म्हणून खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे.