---Advertisement---

तरुणी ऑफिस.. मित्रानेच हात धरला अन् शरीरसुखाची मागणी

by team
---Advertisement---

औरंगाबाद : कंपनीत कामाला निघालेल्या तरुणीचा तिच्या मित्राने बसमध्येच विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नाही तर आरोपी तरुणाने सदर तरुणीचा बसमध्ये हात धरून तिला खाली ओढत माझ्याशी लग्न कर, माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव, अशी मागणी केली. या प्रकरणी पीडित तरुणीने पोलिसांत फिर्यादी दिली. त्यानुसार तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस सूत्रानुसार, आरोपी आणि पीडित तरुणी दोघेही एकमेकांच्या ओळखीचे आहेत. दोघेही एकाच गावातील आहेत. पीडितेचं कुटुंब शहरात वास्तव्यास आहे, तर पीडिता ही एका खाजगी कंपनीत कामाला आहे. आरोपीने पीडितेवर एकतर्फी प्रेम आहे. त्यामुळे तो गेल्या अनेक महिन्यापासून पीडितेला त्रास देत होता. यापूर्वी देखील आरोपी पीडितेच्या घरी गेला होता. त्यावेळी आरोपीची पीडितेच्या आईने समजूत काढली होती. मात्र तरी देखील तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली. त्यानंतर पीडितेने पोलिसांची मदत घेतली होती.

पोलिसांनी आरोपीला समज दिली होती. आता मात्र आरोपी त्रास देणार नाही असे पीडित तरुणीला वाटत होते. त्यामुळे ती नेहमीप्रमाणे कंपनीत कामाला जाण्यासाठी एका कार्यालयाजवळ उभी होती. दरम्यान तेथे कंपनीची बस आली आणि पीडित तरुणी बसमध्ये चढत असताना आरोपीने पीडितेचा हात धरून तिला खाली ओढले व शरीरसुखाची मागणी केली. या धक्कादायक प्रकारामुळे पीडिता घाबरली आणि तिने थेट पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment