टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची निवड; कोण आहेत नोएल टाटा ?

Tata Trust: पदमविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टमध्ये त्यांची जागा कोण घेईल,याचा निर्णय घेणारी बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकी रतन टाटा यांचे बंधू नोएल टाटा यांची निवड होण्याची सर्वाधिक शक्यता होती. यासोबतच मेहली मिस्त्री हे देखील टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते,ते दिवंगत रतन टाटा यांच्या अत्यंत खास आणि जवळचे आहेत.नोएल हे पूर्वीच सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि टाटा ट्रस्टमध्ये विश्वस्त आहेत. नोएल टाटा यांची टाटा समूहाच्या टाटा सन्समध्ये 66% हिस्सेदारी आहे.

 

कोण आहेत नोएल टाटा ?
नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. रतन टाटा यांचे वडील नवल टाटा यांनी दोनदा लग्न केले होते. पहिले लग्न सुनी कमिश्रिएट यांच्याशी झाले होते. रतन टाटा आणि जिमी टाटा अशी नवल टाटा यांच्या दोन मुलांची नावे आहेत. पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर नवल टाटा यांनी 1955 मध्ये स्विस उद्योगपती सिमोनशी लग्न केले. त्यांच्या आणि सिमोनच्या मुलाचे नाव नोएल टाटा आहे. नोएल टाटा यांनी यूकेच्या ससेक्स विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे. याशिवाय त्यांनी फ्रान्सच्या INSEAD बिझनेस स्कूलमधूनही शिक्षण घेतले आहे. नोएल टाटा यांनी टाटा सन्समधील सर्वात मोठे भागधारक आणि सायरस मिस्त्री यांचे वडील पालोनजी मिस्त्री यांची मुलगी आलू मिस्त्री यांच्याशी लग्न केले आहे.

हे वाचलंत का? : Government Schemes: महाराष्ट्र शासनाचे नवीन धोरण वस्रोद्योगांना चालना देणार

नोएल टाटा हे मोठे उद्योगपती आणि करोडोंच्या मालमत्तेचे मालक आहेत. नोएल सध्या टाटा इंटरनॅशनल लिमिटेड, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, व्होल्टास लिमिटेडचे ​​अध्यक्ष आहेत. ते सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट बोर्डाचे विश्वस्त देखील आहेत. याशिवाय नोएल हे टायटन कंपनी लिमिटेडचे ​​उपाध्यक्ष आहेत. ते ट्रेंट लिमिटेडचे ​​11 वर्षे व्यवस्थापकीय संचालक देखील आहेत. या बैठकीत झालेल्या निर्णयात ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या नंतर टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदाची जाबाबदारी नोएल टाटा यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे.